Header Ads Widget

रुग्णाची आई म्हणून ओळखली जाणारी धावती रुग्णवाहिका पेटली गर्भवतीसह चार जण बाल बाल सुदैवाने बचावले !!

        नागोराव शिंदे 
हिमायतनगर :  दिग्रस रुग्णाला दवाखान्यात घेऊन जाणारी धावती रुग्णवाहिका पेटली चालकाने प्रसंगावधान राखून वाहन थांबविल्याने सुदैवाने जीवित हानी टळली मात्र रुग्णवाहिका जळून नष्ट झाली. ही घटना दिनांक ४ एप्रिल गुरुवारी दुपारी बारा वाजताच्या सुमारास आर्णी मार्गावरील अमृत लॉन्स समोर घडली आहे 

दिग्रस येथून चालक निलेश राऊत हे रुग्णवाहिका (क्रमांक एम एच १४ सी एल ०९०५) मध्ये गर्भवती रुग्णाला घेऊन यवतमाळ येथे घेऊन येत होते रुग्ण सोबत तिचे नातेवाईक व डॉक्टर आणि नर्स असे पाच जण रुग्णवाहिकेत होते.रुग्णवाहिका यवतमाळ शहरात पोहोचल्यानंतर अमृत लॉन्स समोर वाहनाच्या बोनेट मधून अचानक धूर येत असल्याचे चालकाला दिसले आहे

चालकाने अचानक ब्रेक दाबून वाहन थांबविले , तो पर्यंत वाहनाच्या केबिनमध्ये आग लागली चालकाने गाडीखाली उडी मारली. रस्त्यावरील नागरिकांनी रुग्णवाहिकेतील लोकांना बाहेर काढले, तोपर्यंत संपूर्ण रुग्णवाहिका आगीच्या भक्ष्य स्थानी पडली नागरिकांनी पाण्याचा मारा करून आग विझविण्याचा प्रयत्न केला आहे

अग्निशमन दलास आगीची माहिती दिली अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले त्यांनी आग आटोक्यात आणली.रुग्णास दुसऱ्या रुग्णवाहिकेत शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे

या घटनेत कोणतीही दुखापत झाली नाही मात्र घटनेमुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ खोळंबली होती. दोन आठवड्यापूर्वी धावती कार पेटल्याची घटना कळंब येथे घडली होती .वाढत्या उन्हामुळे वाहन पेटण्याच्या या घटना घडत आहेत .त्यामुळे उन्हात वाहन बाहेर पडताना योग्य काळजी घेणे आवश्यक असल्याचे या घटना वरून दिसून येते.

Post a Comment

0 Comments