Header Ads Widget

नांदेड लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी देशाच्या हाय पॉवर नेत्याच्या जाहीर सभा का ? घ्याव्या लागतात !!

          माधव पवार 
नांदेड लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी देशाच्या हाय पावर नेत्याच्या सभा का ? घ्याव्या लागतात हा चर्चेचा विषय बनला असल्याने ज्या मतदार संघातून कोणत्या ही राजकीय पक्षाचा उमेदवार निवडणूक लढवीत असेल तर त्यांच्या अस्तित्वावर व त्यांच्या विकास कामावर निवडणूक लढविली पाहिजे असं होत असे जनतेचे स्पष्ट मत आहे

कोणत्या ही निवडणुकीत उमेदवार एकदा निवडून  गेल्याच्या नंतर तो उमेदवार जनसामान्य माणसाच्या संपर्कात व विकास कामा पासून दुर्लक्ष करीत असल्यामुळे मतदानात आपल्यावर काही परिणाम होऊ नये म्हणून अशा हाय पॉवर नेते मंडळीच्या जाहीर सभा पक्षांना घ्याव्या लागतात हे मात्र स्पष्ट उदाहरण आहे

निवडणुका कोणत्या ही असो विधान सभेच्या असो अथवा लोकसभेच्या निवडणुका असो की जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका असो पाच वर्षात केलेल्या विकास कामाचा पाढा नेत्यांनी जनते समोर ठेवून लोकशाही मार्गाने मतदान मागण्याचा सर्वच उमेदवाराला अधिकार असल्याने ते मतदान मागण्याची गरज आहे

जर मतदाराने शांत डोके ठेवून विकास कामाच्या आधारित उमेदवार निवडून दिला तर योग्य ठरणार यात काही शंका नाही परंतु निवडणुकी पुरते मतदाराची दिशाभूल करून कोणत्या ही पक्षाच्या उमेदवाराने व पक्षाने मोठ्या मतधिक्याने विजय मिळवून घेण्याचा केविलवानी प्रयत्न करीत असल्यामुळे मतदार भावनिक होत आहे 

पाच वर्षाच्या कालखंडा नंतर परत निवडणुका येतात आणि मतदाराची दिशाभूल करण्यासाठी राजकीय पक्ष व पुढारी परत एकदा मतदाराच्या दारात मताचे दान मागण्याचा प्रयत्न करीत असतात "अन " एवढी बार आम्हाला मतदान द्या असे भावनिक पद्धतीने मतदाराच्या समोर येऊन मत मिळण्याचा प्रयत्न केला जात आहे

परंतु सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे भारतीय लोकशाही प्रमाणे या देशात दर पाच वर्षांनी सरकार व उमेदवार बदलल्या शिवाय या देशाची व राज्याची प्रगती होऊ शकत नाही असा स्पष्ट दावा मतदारांनी केलेला आहे

Post a Comment

0 Comments