नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या नेतृत्वाखाली व आदेशानुसार सर्व नांदेड जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा सक्षमपणे काम करत असल्यामुळे कुठे ही काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे
नांदेड पोलीस लक्ष देऊन असल्यामुळे नांदेड येथे धारदार शस्त्राचा साठा जप्त केल्यामुळे प्रथम जनतेतून अभिनंदन करण्यात येत आहे
जिल्हाचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या आदेशानुसार आगामी लोकसभा निवडुकीच्या अनुषंगाने नांदेड जिल्हातील अवैद्य शस्त्राचा साठा विक्री करणाऱ्या लोकांच्या विरुध्द कारवाई संदर्भात आदेश देण्यात आले होते
नांदेड पोलीसाच्या दमदार कारवाई मध्ये छापा कारवाई मध्ये ९४ खंजर तसेच ४९ तलवारीसह अन्य दोन शस्त्र असे धारधार शस्त्र पोलीसांनी जप्त करून बडिया कामगिरी केली असल्यामुळे नांदेड पोलीसाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे
नांदेड पोलिसांनी अशा लोकांवर लक्ष ठेवून होते दिनांक १८ मार्च २०२४ रोजी प्राप्त गुप्त माहीती वरून सुशील कुमार , पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम सहाय्यक पोलीस निरीक्षक आर.डी. वटाणे यांनी दमदार कामगिरी बजावली आहे
वरील नेमून दिलेल्या पोलीस पथकातील पोलीस अंमलदार विजयकुमार नंदे, मनोज परदेशी, शरदचंद्र चावरे, रमेश सुर्यवंशी, बालाजी कदम, मेघराज पुरी, शेख इम्राण,भाऊसाहेब राठोड आदी पोलीस कर्मचारी पथकात होती असे सांगितले जात आहे
पथकातील पोलीस कर्मचारी अंकुश पवार, महीला शुभांगी कोरेगावे, अर्चना लांडगे तसेच डी. बी. मधील पोलीस अंमलदार,चंद्रकांत स्वामी, श्रीराम दासरे,यांनी पोलीस ठाणे वजिराबाद पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या गुरुद्वारा गेट क्रमांक एक या ठिकाणी मोठी कामगिरी पोलिसांनी बजावली आहे

0 Comments