Header Ads Widget

डोक्यात कुऱ्हाड मारून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी हिमायतनगर पोलीस ठाण्यात ३०७ दाखल - नांदेडच्या शासकीय रुग्णालयात जखमी उपचार चालू

हिमायतनगर : नागोराव शिंदे - 

हिमायतनगर. तालुक्यातील कोतलवाडी येथील शेतकरी दशरथ पाप्पया गायकवाड वय वर्षे ४० हे दिनांक २२ मार्च २०२४ रोजी सकाळी ८ वाजता कोतलवाडी येथे महाकालीच्या मंदिरा समोर शेतातून घरी येताच सदरचा प्रकार घडला आहे 

या प्रकरणातील आरोपी बालाजी सायबु गायकवाड कोतलवाडी यांने फिर्यादीस आमच्या भावाभावाचे भांडण का ? सोडवले नाही म्हणून एकाच्या डोक्यात कुऱ्हाड मारून जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे

सदरील प्रकरणातील फिर्यादीस जिवे मारण्याच्या उद्देशाने डोक्यात कुऱ्हाडीने डोक्यात मारून गंभीर जखमी केले असल्याने फिर्यादीच्या तक्रारी वरून हिमायतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा ३०७ दाखल करण्यात आला असल्याची माहिती आहे

घटनेतील फिर्यादी दशरथ पाप्पया गायकवाड यांच्यावर नांदेडच्या  शासकीय रुग्णालयात विष्णुपुरी नांदेड येथे उपचार सुरळीत चालू असल्याची माहिती असून या घटनेची माहिती मिळताच हिमायतनगर पोलीसानी सदरचे आरोपी बालाजी सायबू गायकवाड राहणार कोतळवाडी यांच्या विरुद्ध गुन्हा ३०७ भादवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे

 या घटनेतील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक निताताई कदम यांच्या कडे देण्यात आला असल्यामुळे तपासाची गती वाढवून बिट जेमदार एस एल कदम हे पुढील तपास करीत आहेत

Post a Comment

0 Comments