Header Ads Widget

नायगावचे माजी आमदार वसंतराव चव्हाण यांना काँग्रेस पक्षा कडून नांदेड लोकसभेची उमेदवारी जाहीर तगडा पैलवान काही दिवसातच लंगोट घालून दिसणार रणात !!

               माधव पवार
काँग्रेस पक्षश्रेष्ठीने नांदेड लोकसभा निवडणुकीच्या रणात उभे करण्यासाठी नायगाव विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी जिल्हाध्यक्ष वसंतराव चव्हाण यांना उमेदवारी जाहीर केले आहे

नांदेड लोकसभेच्या निवडणुकीत काही दिवसातच तगडा पैलवान लंगोट घालून लोकसभा निवडणुकीच्या रणसंग्रामात पक्कड खेळताना दिसणार आहे
नायगाव विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार वसंतराव चव्हाण यांना लोकसभेचे उमेदवारी काँग्रेस पक्षा कडून मिळाल्यामुळे नायगाव शहरात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आहे 

नांदेड लोकसभा मतदार संघात नायगावचे माजी आमदार वसंतराव बळवंतराव चव्हाण हा एक तगडा पैलवान मानल्या जात आहे

सदरच्या निवडणुकीत यांच्या तोडीस तोड भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्याचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना सदरच्या लोकसभेची उमेदवारी अगोदर जाहीर केली होती सदरच्या रण धुमाळीत चांगली ठसकेबाज निवडणूक रंगणार आहे

राज्याच्या राजकारणात काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पार्टी मध्ये कलगीतुरा चालत असल्याने नांदेड लोकसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून माजी आमदार वसंतराव चव्हाण यांना उमेदवारी दिली  आहे

सदरच्या दरम्यानच्या रणधुमाळीत रणसंग्राम जिंकण्यासाठी लंगोट घातले आहेत 

नायगावचे माजी आमदार वसंतराव चव्हाण यांना काँग्रेस पक्षा कडून नांदेड लोकसभेची उमेदवारी जाहीर तगडा पैलवान काही दिवसातच लंगोट घालून राणात दिसणार आहेत

Post a Comment

0 Comments