Header Ads Widget

कुंटूर पोलीस ठाण्याच्या हादीत नांदेड कडून नायगाव कडे बिअरचे बॉक्स घेऊन जाणारा टेम्पो पलटी पोलीस घटना स्थळी दाखल

                   माधव पवार
नांदेड ते हैद्राबाद राज्य महामार्गावर असलेल्या मैदा कंपनी जवळ म्हणजे नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत नांदेड कडून नायगाव कडे बिअरचे बॉक्स घेऊन जाणारा टेम्पो क्रमांक एम एच २६ एच २८३५ हा पलटी झाला आहे
नायगाव कडे जाणाऱ्या टेम्पोसह बिअरच्या बॉक्सचे फुटून मोठे नुकसान झाले असल्यामुळे कुंटूर पोलीस ठाण्याला माहिती  मिळताच ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामकृष्ण श्रीहरी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार सोनुले, फौजदार खोले,बीट जमादार आर टी पवार पो. कॉ बा-हाळे जीप चालक बोरकर हे घटना स्थळी रवाना झाले आहे 
नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या मैदा फॅक्टरी जवळ नांदेड कडून नायगाव कडे जाणारा बियरचे बॉक्स घेऊन तो टेम्पो पलटी खाल्ला असल्यामुळे कमालीचा दुर्गंधी वास सुटला होता सदरचा टेम्पो रात्रीच्या वेळी जर पलटी खाल्ला असता तर या टेम्पो मधील एक ही बियरचा बॉक्स राहिला नसता अशी चर्चा होताना ऐकावयास मिळत आहे

कुंटूर पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक राम कृष्ण हरी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार आर टी पवार व एक पोलिस कर्मचारी सदर घडलेल्या घटनास्थळी रवाना होऊन घटनेची पाहणी केली नांदेड ते हैद्राबाद राज्य महामार्गावर होत होती 

सदरच्या वाहतुकीची अडचण दूर करण्यासाठी बिट जमादार यांनी पर्याय व्यवस्था म्हणून दुसरी दुसऱ्या रस्त्याने वाहतूक सुरळीत केली आहे




Post a Comment

0 Comments