Header Ads Widget

नायगावच्या महिला तहसीलदार धम्म प्रिया गायकवाड यांची अवैध रेती वाहतुकीवर करडी नजर हयवे पकडला - दमदार कामगिरी

          माधव पवार
महसूल प्रशासनाच्या डोळ्यात धुळ फेकून दुसऱ्या तालुक्यातून नायगाव तालुक्यात रात्रीच्या वेळी अवैध रेतीची वाहतूक करणाऱ्या वहानावर नायगावच्या कर्तव्यदक्ष महिला तहसीलदार धम्मप्रियाताई यांनी करडी नजर ठेवली आहे

तहसील कार्यक्षेत्रातुन अवैधरित्या रेतीची वाहतूक करणारा हायवे पकडून नायगाव पोलिसांच्या स्वाधीन केल्यामुळे अवैध धंदे करणाऱ्याचे चांगलेच धाबे दनाले असल्याचे चर्चा ऐकावयास मिळत आहे

नायगाव तहसील कार्यालया मध्ये काही दिवसा पूर्वी महसूल प्रशासनाचा कारभार चांगल्या प्रकारे हाताळत सदरच्या कर्तव्यदक्ष महिला तहसीलदार धम्म प्रियाताई यांच्या कार्यकाळात नायगाव तालुक्यात कसल्याच प्रकारचे अवैध उत्खलन होणार नाही याची खबरदारी घेत आहे

तालुक्यात व तहसील कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात रात्री बे रात्री चोरट्या मार्गाने रेतीचे उत्खलन व मुरुमाचे उत्खलन ज्या ठिकाणी करण्यात येत आहे

त्या ठिकाणी आता कारवाईसाठी कडक भूमिका महिला तहसीलदार गायकवाड ताई यांनी घेतली असल्याचे सदरच्या कार्यवाई वरून स्पष्ट दिसून येत असून असे प्रकार कदापि चालू देणार नाही असे सदरच्या कार्यवाई वरून दिसून येत आहे 


Post a Comment

0 Comments