Header Ads Widget

रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या टाकळी शिवारात झालेल्या विचित्र अपघातात पाच ते सहा जण गंभीर जखमी पोलीस घटना स्थळी रवाना !!

                माधव पवार
नरसी ते देगलूर राज्य महामार्गावर विचित्र अपघात झाला असून यात ट्रक व दोन कारचा अपघात झाला असल्याची माहिती असून या अपघात सहा ते सात जण जण गंभीर जखमी झाल्याचे समजते ही घटना दिनांक २७ मार्च २०२४ रोजी संध्याकाळी अंदाजे ५ ते साडे पाच वाजण्याच्या सदरची घटना घडली असून सदरची घटना ही टाकळीच्या शिवारात घडल्याचे सांगण्यात येते आहे

रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या नरसी ते देगलूर रोडवर अपघाताचे वाढले असल्याने अनेकांना जीवाला मुकावे लागत असून अशीच एक घटना रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या टाकळी शिवारात एका विचित्र अपघातात म्हणजे एक ट्रक व दोन कारा यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दोन्ही कारचा चुरडा वाजला तर ट्रकचे बॉयनेट डॅमेज झाले आहे

नरसी कडून देगलूर कडे जाणारा ट्रक क्रमांक आर.जे.१४ जि एच ६७८६ तसेच देगलूर कडून नरसीकडे जाणारी सदरची कार क्रमांक एम.एच २७ ए एफ ८८०८ व एम.एच.१९ बि जे ७९१३ या कारचा टाकळी येथील पुलाच्या जवळ सदरचा हा विचित्र अपघात घडला आहे

रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या अंतर्गत घडलेल्या अपघातातील जखमींना देगलूरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार करून नांदेडच्या शासकीय रुग्णालयात पाठविल्याचे सांगण्यात येते आहे  

Post a Comment

0 Comments