Header Ads Widget

ग्रामपंचायत कार्यलय रुई बु येथे शासन आपल्या दारी योजने अंतर्गत मंडळधिकारी त महिला तलाठी यांच्या उपस्थितीत विविध योजनेची माहिती -

          माधव पवार
नायगाव तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यलय रुई बु येथे शासन आपल्या दारी योजने अंतर्गत मंडळधिकारी त महिला तलाठी यांच्या उपस्थितीत विविध योजनेची माहिती देण्यात आली यावेळी महिला विद्यमान महिला सरपंच प्रतिनिधी निलेश देशमुख यांनी सदरच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेतालुक्यातील रुई बु ग्रामपंचायत कार्यलयाच्या वतीने सदरच्या शासन आपल्या दारी या योजनेच्या माध्यमातून गोरगरीब लोकांना सदरच्या योजनेची परिपूर्ण माहिती मिळावी या हेतूने गावच्या महिला सरपंच प्रतिनिधी निलेश देशमुख यांनी आयोजन केले आहे 
शासन आपल्या दारी योजने अंतर्गन सज्जाचे मंडळ अधिकारी यांनी सरपंच प्रतिनिधी यांनी सूचना केल्यामुळे गावातील निराधार महिलांना संजय गांधी निराधार योजन व श्रवण बाळ योजना व इतर शासनाच्या योजनेच्या  संदर्भात माहिती दिली

नायगावच्या महिला तहसीलदार गायकवाड ताई यांच्या मार्गदर्शनाखाली यावेळी मंडळधिकारी कानगुले तलाठी मॅकलवाड ताई महिला ग्रामसेवक स्वतीताई तोपलवाड ह्या उपस्थित होत्या असे दिसून आले आहे 

गावातील गोर गरीब महिलांना त्यांचे श्रवण बाळ व संजय गांधी योजनेचे फॉर्म भरून दिले गेले अशा प्रकारे गावातील तीस ते ३५ महिलांना या योजनेचा लाभ मिळण्याची खात्री दिली आहे

Post a Comment

0 Comments