Header Ads Widget

राष्ट्रवादी काँग्रेस रोजगार व स्वयंरोजगार विभाग महाराष्ट्राच्या राज्य सचिव पदी भगवान बागुल यांची निवड

         नागोराव शिंदे 
हिमायतनगर.  प्रदेशाध्यक्ष मा सुनील तटकरे यांच्या मान्यतेने रोजगार व स्वयंरोजगार सेल मुंबईच्या वतीने एका कार्यक्रमात मुंबई येथे राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,व महिला प्रदेशाध्यक्ष सौ रुपाली चाकणकर, तसेच महिला व बालविकास मंत्री अदिती ताई तटकरे, त्याचबरोबर युवक प्रदेशाध्यक्ष माननीय सुरज चव्हाण ,यांच्या अध्यक्षतेखाली रोजगार व स्वयंरोजगार पदाधिकाऱ्यांचा मार्गदर्शन मेळावा आणि आढावा बैठक व पद नियुक्ती राष्ट्रवादी काँग्रेस रोजगार व स्वरोजगार विभागामार्फत महाराष्ट्र राज्य सचिव पदी श्री भगवान बागुल  यांची निवड झाल्याचे नियुक्तीपत्र प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हस्ते मुंबई येथे एका मोठ्या कार्यक्रमात देण्यात आले आहे ,
 सदरील कार्यक्रम हा महिला विकास मंडळ जगन्नाथ भोसले मार्ग नरिमन पॉईंट बँक ऑफ बडोदा मुंबई येथे आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमांमध्ये भगवान बागुल यांच्या निवडीचे नियुक्तीपत्र देऊन त्यांचा मानसन्मान करण्यात आला असल्याने यावेळी भगवान बागुल यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे ,

Post a Comment

0 Comments