व्हीपीके गुळपावडर कारखाना प्रयागनगर सिंधी, वाघलवाडा येथील एमव्हीके साखर कारखाना व डॉ. शंकरराव चव्हाण गुळपावडर आधी तिन कारखाना अंतर्गत गळीत हंगाम २०२३ ते २०२४ फेब्रुवारी अखेर पर्यत पाच लाख मेट्रिक टन ऊस गाळप यशस्वी रित्या केले असल्याची माहिती समुहाचे संस्थापक अध्यक्ष कवळे गुरूजी यांनी दिले आहे महाराष्ट्रातल्या राजकीय नेत्यांना व पुढाऱ्यांना निवडणुकीचे तर शेतकरी नेते कवळे गुरुजी हे तमाम शेतकऱ्यांसाठी व्यस्त असल्याचे दिसून येत असून कवळे यांच्या माध्यमातून शेतकऱ्यासाठी होतासाठी निर्णय घेऊन ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रयत्न करीत आहेत
जानेवारी ०१ ते १५ तारखे पर्यंत एकरकमी २५५०/- रू आणि १५ ते ३१ जानेवारी पर्यंत २६००/- रू प्रती टन (प्रती पंधरवाडा पन्नास रुपये वाढ प्रमाणे) एकरकमी दर देण्याचे आले आहे. त्या सोबतच फेब्रुवारी आखेर पर्यंत गाळपास आलेल्या ऊसास २७००/- रू प्रती टन देण्यात येणार तर मार्च अखेर पर्यंत ऊस गाळपासाठी आल्यास एकरकमी २८००/- रू प्रती टन भाव देण्याचे उद्योग समूहाच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.
जर ऊस उत्पादक शेतक-यांनी स्वंता तोड व वाहतूक खर्च करुन वाघलवाडा साखर कारखान्यावर ऊस गाळपाशी घेऊन आल्यास तात्काळ ऊसाचा काटा झाल्या झाल्या ३७०० रुपये प्रतीटन प्रमाणे नगदी स्वरुपात रुपये दिले जातील. त्यामूळे कार्यक्षेत्रातील शेतकरी बांधवांनी उच्चांकी भाव मिळवून आपली आर्थिक उन्नती झाली पाहिजे हा मुळ हेतू कवळे गुरुजी यांनाचा आहे
ऊस उत्पादक शेतक-यांना ऊस पिकाला दर्जेदार भाव उद्योग समूहाच्या वतीने मिळत असल्याने शेतक-यांनी मोठ्याप्रमाणात ऊस लागवड करावे. जेणेकरुन ज्या शेतक-यांला नवीन ऊस लागवड कराव्याचे झाले असल्यास कारखान्याच्या ऊस विकास योजने अंतर्गत ऊस रोप व बेणे घेऊन लागवड करावी असे आहवान मारोतराव कवळे गुरूजी यांनी केले.

0 Comments