व्हिपीके उद्योग समूहातील एमव्हिके ॲग्रो साखर कारखाना कुसूमनगर वाघलवाडा,व्हिपीके ॲग्रो प्रयागनगर सिंधी व डॉ शंकरराव चव्हाण जागरी ॲग्रो प्रा.ली कुसुमनगर वाघलवाडा या तिन्ही कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील व कार्यक्षेत्रा बाहेरील ऊस उत्पादक शेतक-यांनी आपला ऊस स्वता तोड व वाहतूक करुन आणावेत असे आवाहन शेतकरी नेते कवळे यांनी केले आहे आमच्या साखर कारखान्यावर घेऊन आल्यास ऊसाचा काटा केल्या नंतर नगदी ३७०० रुपये भाव प्रतिटन देण्यात येईल असे व्हिपीके उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष कवळे गुरुज यांनी जाहीर केले आहे.
सविस्तर वृत्त असे की ऊस उत्पादक शेतक-यांच्या फायदा झाला पाहिजे असे कवळे गुरूजी यांनी नवीन योजना अंमलात आणली असुन ती योजना शेतकऱ्यांना आर्थिक नफा देणारी योजना आहे
नांदेड जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी असो की इतर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतक-यानी स्वतः तोड आणि स्वता वाहतूक खर्च करून आमच्या कारखान्यास ऊस गाळपास पाठवल्यास प्रती टन तब्बल ३७००/- रूपये भाव काटा पेमेंट देण्याचे जाहीर केले आहे
जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी बांधवांनी आपला ऊस व्हीपीके उद्योग समूहातील कारखान्यास घालून या योजनेचा लाभ शेतक-यांनी घ्यावा असे शेतकरी नेते तथा कारखान्याचे चेअरमन मारोतराव कवळे गुरूजी यांनी आहवान केले.

0 Comments