Header Ads Widget

सगेसोयरे हे जीआर कायद्यात रुपांतर करा उमरीत सकल मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन शांततेत !!

         माधव पवार
महाराष्ट्रात मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी धगधगते वारे सुरू झाले असुन आरक्षण योध्दा मनोज जरांगे पाटिल यांच्या आदेशानुसार मराठा समाजाला ओबीसी प्रवार्गातून आरक्षण मिळावे यासाठी सगे सोयरे कायद्याची अंमलबाजणी करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी २४ फेब्रुवारी २०२४ पासून बेमुदत उमरीत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे
उमरी तालुक्यातील सकाल मराठा समाज रस्त्यावर उतरून करण्यात आले आहे. तरी शासनाने त्यांच्यातर्फे दिलेल्या जीआर चा लवकरात लवकर कायद्यात रूपांतर करून मराठा समाजाला फायदा करून द्यावा अशी मागणी आहे

शासन प्रशासनाने या रास्ता रोको ची दखल न घेतल्यास मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या पुढील आदेशानुसार मराठा समाज अजून तीव्र आंदोलन करेल याची प्रशासनाने नोंद घ्यावी असे नारे देत.व उपमुख्यमंञी,छगन भुजंबळ सह अन्य बरेच नेत्याना शिव्या देत उमरी भोकर व उमरी कारेगाव आधी रस्तावर  रस्तारोको आंदोलन करण्यात आले आहे
तहसीलदारासह पोलीस प्रशासन यांना निवेदन देण्यात आले असून यावेळी योगेश पाटील मोरे, दत्ताहरी पाटील ढगे, बालाजी पाटील ढगे, देविदास पाटील शिंदे, दत्ता पाटील जाधव, अविनाश पाटील जाधव , ज्ञानेश्वर पाटील येताळे, हनमंत पाटील बेंद्रे, मधुकरराव पाटील सावंत, साईनाथ नुतोवाड, गोविंद पाटील उमाटे, प्रसाद पाटील भोसले यावेळी उपस्थितीत होते 

श्रीमंत पाटील भोसले, लोकजेश्वर पाटील भोसले, यासह मोठ्या संख्येने सकल मराठा समाज बांधव रास्तारोको आंदोलनात सहभाग होता. रस्तारोको आंदोलन केल्याने वाहनचालक व प्रवाशांची तारांबळ उडाली होती. काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी उपपोलीस निरिक्षक श्री. माने, श्री. चौवले, सह पोलीस कर्मचाराचा फौजफाटा उपस्थित होता.

सगेसोयरे हे जिआर मध्ये घ्या असे उमरी तालुक्यातील मराठा बांधव रस्त्यावर उतरून आंदोलन करुन तहसीलदार व पोलीस प्रशासनाला निवेदन देताना.

Post a Comment

0 Comments