नायगाव तालुक्यातील सावरखेड येथे समस्त गावकऱ्यांच्या वतीने सार्वजनिक शिव जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या जयंती सोहळ्याच्या निमित्ताने सकाळी दहा वाजता माँ जिजाऊ साहेब यांचे सुपुत्र हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिव छत्रपती राजे यांच्या प्रथम प्रतिमेला पुष्पहार घालून भगवा ध्वज फडकवण्यात आला आहे
तालुक्यातील सावरखेड येथे सर्व धर्माचे बांधव या जयंती सोहळ्या मध्ये सामील होऊन शिव छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंती सोहळ्याच्या निमित्ताने अभिवादन करण्यात आले व दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान गावातील मुख्य रस्त्याने बहुजनाचे राजे जाणता राजा यांच्या तैल चित्राची मिरवणूक समस्त गावकऱ्यांच्या वतीने सावरखेड येथे काढण्यात आली आहे
सावरखेड येथे घोड्यावर बसलेला शिव शिवाजी महाराज यांचा भव्य असा पुतळा हनुमान मंदिराच्या पटांगणात असलेल्या कमानी जवळ बसवण्यात आला आहे
मारोती रायाचे दर्शन घेण्यासाठी गावकरी जातात परंतु प्रथम या गावात शिव छत्रपती शिवाजी राजे यांचे दर्शन होते अशा महापुरुषांचा पुतळा घोड्यावर बसलेला असून त्या ठिकाणी शिवरायांचे मावळे जवळच असलेले दिसून येत आहे
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावरखेड येथील मुख्याध्यापकासह शिक्षक वृंदा बरोबर विद्यार्थ्यांचे शिवछत्रपती शिवाजी महाराज जयंती सोहळ्याच्या कार्यक्रमां मध्ये मोठे योगदान असल्याचे दिसून आले आहे
या गावातील ज्येष्ठ नागरिक गोविंदराव ग्यानोबा पाटील वानखेडे चंपती शुभांनजी पाटील ढगे दत्ता मारोती आपतवाड श्रीपती गोपाळराव पाटील वानखेडे गंगाधर भिवजी पाटील वानखेडे दिगंबर धोंडीबा गायकवाड गोविंद सखाराम पाटील वानखेडे कोंडीबा गंगाराम पाटील वानखेडे आदी यावेळी उपस्थित होते
यावेळी बालाजी लक्ष्मणराव पाटील ढगे संभाजी दिगंबर पाटील वानखेडे हनमंतराव माधवराव पाटील वानखेडे महात्मा गांधी तंटामुक्त अध्यक्ष सदाशिव पोतन्ना शंकवाड मारोतराव दाजीबा पाटील वानखेडे यांच्यासह समस्त गावकऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती सोहळ्याच्या निमित्त सहभाग नोंदविला होता असे गावकऱ्यानी सांगितले आहे

0 Comments