हिमायतनगर : नागोराव शिंदे :-
हिमायतनगर तालुक्यामध्ये सध्या अवैध वाहतुकीने कळस गाठला असून त्या बाबत अनेक तक्रारी तहसीलदार आदित्य शेंडे यांच्या कडे जाताच तात्काळ हिमायतनगर सज्जयाचे मंडळ अधिकारी व तलाठी यांना कार्यवाही करण्याच्या सुचना दिल्या असता त्यांनी सापळा रचून हि कार्यवाही केली असल्याचे मंडळ अधिकारी बी एम चव्हाण यांनी सांगितले आहे
अवैध उत्खनन होत असल्याचे निदर्शनास आले असल्याने हिमायतनगर तहसील कार्यालयाचे कर्तव्यदक्ष तहसीलदार आदित्य शेंडे यांनी कारवाईचा बडगा उगारल्याचे चित्र दिनांक १४ रोजी रात्री तालुक्यातील सवना ( ज)गावामध्ये दिसून आले आहे
याबाबत सविस्तर वृत्त असे की सवना ( ज)येथील अवैध उत्खनन करणाऱ्या एक जेसीबी सह दोन ट्रॅक्टर पकडून ताब्यात घेऊन पोलीस पाटील यांच्या ताब्यात एक जेसीबी दिले आणि दोन ट्रॅक्टर हिमायतनगर किनवट रोडवर आढळून आले
असता तहसील कार्यालयामध्ये लावले असून महसूल प्रशासनाच्या नियमानुसार कार्यवाही केली असल्याचे हिमायतनगर सज्याचे मंडळ अधिकारि बि एम चव्हाण व हिमायतनगर सज्याचे तलाठी जावरकर यांनी नायगाव फास्ट न्यूज बोलताना सांगितले आहे

0 Comments