हिमायतनगर : नागोराव शिंदे -
हिमायतनगर तालुक्यातील धानोरा येथील सामाजिक कार्यकर्ते म्हणून ज्यांचि संबंध तालुकाभर ओळख असलेले, विजयकुमार दिगांबर वळसे पाटील यांची निवड ,ग्रारामविकास व पंचायत राज, पर्यटन महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री नांदेड श्री गिरीश महाजन यांच्या
शिफारशी वरुन नांदेड चे जिल्हाधिकारी डॉ अभिजीत राऊत यांच्या स्वाक्षरीचे पत्र नुकतेच हिमायतनगर तालुक्यात धडकताच विजयकुमार वळसे पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्ष होताना दिसून आला आहे
या समितीमध्ये अध्यक्ष म्हणून वळसे पाटील तर सदस्य पदी मागासवर्गीय प्रतिनिधी म्हणून दिलीप साळवे, सर्वसाधारण प्रवर्गातील प्रतिनिधी म्हणून रावजी उर्फ नामदेव तवर इतर मागासवर्गीय प्रतिनिधी म्हणून आशिष सकवान ,इतर मागासवर्गीय प्रतिनिधी म्हणून पवन करेवाड, सर्वसाधारण प्रवर्गातील प्रतिनिधी म्हणून
सुधाकर पवार ,अपंग प्रवर्गातील प्रतिनिधी म्हणून प्रमोद शिरफुले , स्वयंसेवी संस्थेचा प्रतिनिधी म्हणून एकनाथ जाधव, सामाजिक क्षेत्रात काम करणारा प्रतिनिधी म्हणून राजू जाधव, जेष्ठ नागरिक प्रतिनिधी म्हणून गजानन गोपेवाड यांची उपरोक्त नियुक्ती केलेले अध्यक्ष व सदस्य यांनी संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीचि बैठक शासन निर्णय दिनांक २० ८ २०१९
नुसार नियमित बैठक घेउन शासनाचे आदेशानुसार लाभार्थ्यांची अर्ज मंजुरी बाबतची कार्यवाही करण्यात यावी या आदेशानुसार वरील समिती अस्तित्वात आली असल्याचे नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी काढलेल्या पत्रकामध्ये म्हटले आहे हिमायतनगर तालुका कार्यकारणी मध्ये निवड झाल्या बद्दल सर्व पदाधिकारी यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे

0 Comments