Header Ads Widget

मांडणी च्या पोलिस पाटील पदी सौ.मोहिनी प्रशांत जाधव याची निवड.

        माधव पवार
नायगांव तालुक्यातील मोजे मांडणी या गावच्या पोलीस पाटील पदी सौ.मोहिनी प्रशांत शिंदे यांची निवड झाल्याची निवड यादी उपविभागीय अधिकारी सचिन गिरी यांनी जाहीर केली आहे. 
      
बिलोली उपविभाग अंतर्गत नायगांव  तालुक्यातील सर्व गावच्या पोलीस पाटील पदाची निवड प्रक्रिया नुकतीच पार पडली आहे. सदरील निवड प्रक्रियेत तालुक्यातील मांडणी गावचे पोलीस पाटील पद हे सर्वसाधारण महिलांसाठी राखीव होते

या पदासाठी गावातून अनेकानी अर्ज दाखल करून नशीब आजमावले पण त्यापैकी चार उमेदवार हे लेखी परीक्षेत पात्र झाले होते. उपविभागीय अधिकारी सचिन गिरी यांनी मुलाखत घेऊन मांडणी गावच्या पोलीस पाटील पदी सौ. मोहिनी प्रशांत शिंदे यांची गुनानुक्रमे निवड करण्यात आल्याची निवड यादी जाहीर केले आहे.

मोहिनी शिंदे या उच्चशिक्षित असून त्याचे पहिली पासून ते पदव्युत्तर शिक्षण एज्युकेशन सोसायटी नायगाव येथे झाले आहे. सदर  निवडीबद्दल गावकऱ्याच्या वतीने मोहिनी शिंदे यांचा  भव्य सत्कार करण्यात आला आहे

या निवडी बद्दल  मांडणी गावातील मान्यवारासह एज्युकेशन सोसायटी नायगाव चे अध्यक्ष वसंतराव पाटील चव्हाण, संस्थेचे सचिव, युवा नेते प्रा. रवींद्र पाटील चव्हाण, श्रीनिवास पा. चव्हाण, विजय पा. चव्हाण, जनता कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य के. जी. सूर्यवंशी, माजी मुख्याध्यापक आनंदराव शिंदे,

कंधार प. स. चे शालेय पोषण आहार अधीक्षक सुरेश जाधव, सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी शंकरराव जाधव,प्रा. पी. डी. जाधव बारूळकर, विश्वास जाधव याच्यासाह जनता हायस्कुल येथील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी  अभिनंदन करून भावी कार्यास शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments