Header Ads Widget

महाराष्ट्र नाभिक महामंडळाकडून पार्डी व कांडली बू. येथील नवनिर्वाचित पोलीस पाटलांचा सन्मान..प्रतिकूल परिस्थितीवर मात करत नितिका जोन्नापल्ले व संतोष वाघमारे यांनी मिळविले यश नाभिक समाज बांधवा कडून त्यांचा सन्मान...


हिमायतनगर : नागोराव शिंदे

नुकतीच पोलिस पाटील भरती प्रक्रिया घेण्यात आली सदरील परीक्षा ऑनलॉईन घेतल्यामुळे कुठेही गैरप्रकाराला संधी मिळाली नाही त्यामुळे या सर्व भरती प्रक्रियेत एकूण ८६७२ उमेदवारांनी परीक्षा दिली होती. त्यामध्ये ३१५६ उमेदवारांना मुलाखतीसाठी पाचारण करण्यात आले होते
त्या मुलाखत प्रक्रियेत सुद्धा जिल्हाधिकारी अभिजित राऊत व  उपविभागीय अधिकारी हदगाव यांनी पारदर्शक काम केल्या मुळे हिमायतनगर तालुक्यातील गोर गरीब गुणवंत विद्यार्थ्यांना संधी मिळून त्यांना पोलीस पाटील होण्याचा बहुमान मिळाला आहे

हिमायतनगर तालुक्यातील नाभिक समाजाच्या दोन प्रतिनिधीना पोलीस पाटील होण्याचा मान मिळाल्या बद्दल महाराष्ट्र नाभिक महा मंडळा तालुका शाखेच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला..

या बाबत सविस्तर वृत्त असे की पोलीस पाटील म्हंटल की  महसूल व पोलीस प्रशासन यांच्यामधील दुवा असलेले एक  मनांचे पद  ग्रामीण भागातील मानाचे व प्रतिष्ठेचे समजले जाणारे पद म्हणजे पोलीस पाटील होय उपविभागीय अधिकारी कार्यालय हदगाव यांनी नुकतीच पोलीस पाटील भरती प्रक्रिया २०२३ मध्ये लेखी व मुलाखतीच्या निवड प्रक्रियेमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांना संधी दिली होती

या परीक्षेमध्ये हिमायतनगर तालुक्यातील असंख्य गुणवंत विद्यार्थ्यांनी जागेच्या आरक्षना नुसार सहभाग घेतला होता त्यामध्ये हिमायतनगर तालुक्यातील मौजे कांडली बु. येथील संतोष माधव वाघमारे व मौजे पारडी येथील निकिता रवी जोनापल्ले या नाभिक समाजाच्या दोन उमेदवारांनी पोलीस पाटील भरती प्रक्रियेमध्ये घवघवीत असे यश संपादन करून नाभिक समाजाचे नाव उज्वल केले आहे

महाराष्ट्र नाभिक महामंडळ तालुका शाखेच्या वतीने दिनांक २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून निकिता रवी जोनापल्ले पारडी व संतोष माधव वाघमारे कांडली बु.त्यांच्या गावामध्ये जाऊन ग्राम पंचायत कार्यलय मध्ये नाभिक समाज बांधवांनी त्यांचा भव्य सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत

यावेळी महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे तालुका अध्यक्ष गजानन चायल, समाजाचे मुख्य मार्गदर्शक सचिन कळसे सर, दिलीप कोंडामंगल सर,अवधूत बोडकेवाड, व्यंकटी गंधम, रमेश लिंगमपल्ले, प्रकाश घुंगरे, श्रीकांत घुंगरे, पप्पू सोळंके नागेश शिंदे ,रवी जोनापल्ले,गणेश वाघबरे,आनंद गायकवाड, ज्ञानेश्वर लिंगमपल्ले ,अशोक वाघमारे,दत्ता सोळंके,किरण सोळंके,गोविंद वाकेकर सह महाराष्ट्र नाभिक महा मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

Post a Comment

0 Comments