Header Ads Widget

ओबीसी समाज संघर्ष समितीच्या वतीने २२ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता बैठकीचे आयोजन

          माधव पवार 
ओबीसी समाजाचे महानायक नामदार छगन भुजबळ यांची नव वर्षांच्या प्रारंभी नरसी येथे होणार्या विराट सभेच्या नियोजनासाठी दिनांक २२ डिसेबंर २०२३ रोजी ओबीसी नायगाव तालुका संघर्ष समितीच्या बैठकीचे आयोजन दुपारी २ वाजता शहरातील प्रसिद्ध श्री मार्कंडेय मंदिरात करण्यात आले आहे.
   
आपल्या हक्कासाठी, हक्कच्या रक्षणासाठी लोकशाहीचा रक्षक आणी बहूसंखेने असलेल्या ओबीसी समाजाने वज्रमुठ आवळली असून जनजार्गती करण्यासाठी गाव पातळीवर बैठकाचे आयोजनाचे नियोजन या बैठकीत करण्यात येणार असल्याची माहिती आहे 

ओबीसी आरक्षणाचा वाटा इतर कोणत्याही वर्गाला देण्यात येवुनये आपल्या आरक्षणाच्या  रक्षणासाठी जन जागरण करण्यासाठी तालुक्यातील गावागावात बैठकीचे नियोजन व ना.भुजबळ यांच्या सभेच्या पुर्व तयारी च्या नियोजना साठी ओबीसी नेते डाॅ बी.डी.चव्हाण, अविनाश भोसीकर व महेंद्र देमगुंडे हे  बैठकीत मार्गदर्शन करणार आहेत

ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू नये म्हणून शासनाला जागृत करण्यासाठी भव्य दिव्य एका सभेचे आयोजन नरसी येथे करण्यात आले  आहे.नायगाव तालुक्यातील सर्व ओबीसी समाज बांधवांनी दि.२२ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता आयोजीत करण्यात आलेल्या बैठकीस उपस्थित रहावे असे आव्हान ओबीसी संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आले आहे

Post a Comment

0 Comments