लोहा पोलिस स्टेशनच्या सायबर सेल तर्फे सोशियल मीडियाच्या निरीक्षणात एका मुलाने फेसबुकवर प्राण हत्यारासह फोटो अपलोड केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती लोहा पोलिस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांनी दिनांक ४ डिसेंबर २०२३ रोजी दिली असून वरील दोन्ही फोटो एकाच मुलाची आहे
दिनांक ४ डिसेंबर २०२३ रोजी लोहा पोलिस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली लोहा पोलीस ठाण्याच्या सायबर सेल मार्फतीने सोबत सोशल मीडियाचे निरीक्षण करत असताना लोहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका मुलाने त्यांच्या सोशल मीडियाच्या फेसबुक ॲपवर लोखंडी कोयता व खंजीर असे प्राणघात हत्यार हातात घेऊन सामान्य जनमानसात दहशत पसरण्याच्या उद्देशाने ते फोटो सोशल मीडिया ॲपवर अपलोड केल्यामुळे त्यांच्यावर लोहा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
लोहा पोलिसांनी सदर मुलाचे सोशल मीडिया ॲपवरून त्यांचे नाव व गाव संपूर्ण माहिती मिळाल्या वरून पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नाईक यांनी फिर्याद दिल्याने रात्री उशिरा पोलीस स्टेशन लोहा येथे कलम ४ / २६ भारतीय हत्यार कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला सदरील गुन्ह्याचा तपास पोहेका चोपलवाड हे करीत आहेत
तरी लोहा शहरातील व हद्दीतील सोशल मीडियाचा वापर करणाऱ्या जनतेला लोहा पोलीस स्टेशन तर्फे आवाहन करण्यात येते की आपण आपले सोशल मीडिया ॲप / अकाउंट हे काळजी पूर्वक हाताळणे लोह पोलिस स्टेशनच्या सायबर सेल मार्फत सर्व सोशल मीडियाची सखोल निरीक्षण करण्यात येत असून काही अक्षेपाहार्य पोस्ट कॉमेंट्स नजरेस पडल्यास संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांनी दिला आहे

0 Comments