नांदेड लोकसभा मतदार संघांचे विद्यमान भाजपाचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या माध्यमातून नायागांव तालुक्यातील मौजे बरबडा येथील येताळेश्वर मंदिराच्या बांधकामासाठी एकूण दहा लाखाचा निधी ? देण्यात आला होता परंतु गेल्या एक ते दीड वर्षांपासून सदरच्या मंदिराचे बांधकाम अर्धवट अवस्थेत असल्यामुळे सदरच्या कामाचे गुत्तेदार कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे
खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा दहा लाखाचा निधी अन बरबडा येथील रेताळेश्वर मंदिराचे काम अर्धवट गुत्तेदार कोण ? -
भाजपाचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी जिल्ह्याचा विद्यमान खासदार झाले तेव्हा त्याची प्रथमच तालुक्यातील बरबडा येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती त्या जाहीर सभे दरम्यान समस्त गावकऱ्याच्या वतीने येताळेश्वर मंदिरासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा मागणी करण्यात आली होती
नायगाव तालुक्यातील मौजे बरबडा येथील येताळेश्वर
मंदिराला दहा लाखाचा निधी आला असताना सुद्धा सदरचे काम कशामुळे रखडले हा चर्चेचा विषय बनला असून सदरच्या मंदिराचे काम तात्काळ करण्यात यावे अशी मागणी गावकऱ्यानी केली आहे
तालुक्यातील बरबडा येथील येताळेश्वर मंदिराचे बांधकाम दर्जेदार व चांगल्या पद्धतीचे करण्यात यावे म्हणून भाजपाचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी दहा लाखाचा निधी मंजूर करून दिला खरा परंतु सध्याच्या परिस्थिती मध्ये काम अर्धवट अवस्थेत असल्यामुळे गावकऱ्यातुन संताप व्यक्त केला जात आहे

0 Comments