Header Ads Widget

मातंग समाजाच्या आरक्षण क्रांती ५ वी पदयात्रा मोर्चात नागपूर येथे १३ डिसेंबरला लाखोंच्या संख्येने सहभागी व्हावे राजेश वाघमारे यांचे आवाहन

.        माधव पवार
मातंग समाजाच्या गेल्या अनेक वर्षांपासून विविध मागण्या शासन दरबारी प्रलंबित असल्यामुळे समाजाच्या अनेक मागण्या धुळखात पडल्या आहेत त्यामुळे महाराष्ट्रातील मातंग समाजाच्या व लहुजी शक्ती सेना संस्थापक लहुश्री विष्णु भाऊ कसबे वतीने दिनांक १३ डिसेंबर २०२३ रोजी यशवंत स्टेडियम नागपूर येथे 
आयोजित करण्यात आला आहे

पुणे ते नागपूर हिवाळी अधिवेशनावर आरक्षण क्रांती ५ वी पदयात्रा मोर्चात महाराष्ट्र राज्यतुन मातंग समाज मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्यामुळे लाखोच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन राजेश वाघमारे यांनी केले आहे

अनुसूचित जातीसाठी महाराष्ट्रामध्ये १३ % आरक्षणाची तरतूद आहे.१३% आरक्षणमध्ये ६० जातीचा समावेश आहे ६० जाती पैकी केवळ ०२ ते ०३ जातीला आरक्षणाचा लाभ मिळतो उर्वरित ५७ जाती लाभापासून वंचित राहतात आरक्षणाचा लाभ घेवून तयार झालेला जात समूहा सोबत स्पर्धा करणे तळातील जास्त समूहासाठी जवळपास अशक्यप्राय झाले आहे

त्यामुळे ५७ जाती उपाशी आहे २ ते ३ जाती तुपाशी. अशी भीषाण परिस्थिती निर्माण झाली आहे. निर्माण झालेली विषम रचना बदलण्यासाठी महाराष्ट्र सरकारने आजपर्यंत प्रयत्न केलेला नाही. परंतु देशातील इतर राज्यांनी मात्र आप आपल्या राज्यात सेवा निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली अभ्यास आयोगाची स्थापना करून आरक्षण वाटपाची पद्धती  फार्मुला ठरविला आहे

Post a Comment

0 Comments