नांदेड जिल्ह्याच्या नायगाव येथे सहा तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या विराट सभेसाठी सकल मराठा समाजाच्या जय्यत तयारी करण्यात आली असून नायागांव नगर पंचायतच्या वतीने सर्व कर्मचारी या ठिकाणी साफ सफाई करण्यासाठी जूटली असून सदरच्या विराट सभेला लाखोच्या संख्येने मराठा बांधव उपस्थित राहणार आहे
जिल्ह्यातील नायगाव धर्माबाद मुखेड देगलूर बिलोली उमरी या ठिकाणच्या तालुक्यातुन मराठा योद्धा जरांगे पाटील यांची सभा बैल बाजार म्हणजे नायागांव येथील हनुमान मंदिराच्या पाटी मागील पंटागणांत आयोजित करण्यात आली सदरची ही विराट सभा ही दिनांक ८ डिसेंबर २०२३ रोजी दुपारी ३ वाजता होणार असल्यामुळे सकल मराठा समाजाच्या वतीने सदरच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहेसकल मराठा समाजाचा आरक्षणाचा मुद्दा अध्याप प्रलंबीत असल्यामुळे सरकार परत एकदा जागे करण्यासाठी नायागांव येथे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या विराट सभेचे आयोजन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले या विराट सभेचे साठी सहा तालुक्यातील मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे
मराठा योद्धा जरांगे पाटील यांच्या सभेची नायगाव येथे जय्यत तयारी लाखोच्या संख्येने मराठा समाज उपस्थित राहणार अशी माहिती नायागांव फास्ट न्यूजला मिळाली आहे

0 Comments