नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या मौजे सावरखेड येथील रहिवासी असलेले शिक्षक सुधाकर वानखेडे यांच्या वयोवृद्ध वडिलांना शेतातील आखाड्यावर अज्ञात चोरट्याने खाटेवर बांधून तोंडात बोळा कोंबून सोयाबीनचे अंदाजे ५० किलो भरलेले पांढरे पोते २५ पोते पळवून नेले असल्याने कुंटूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल बहात्तरे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार व्ही आर कुसमे यांनी या घटनेचा कसून तपास करीत आहे
नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या सावरखेड शिवारातील एका शिक्षकांचे शेत आहे त्या शेतात काढलेली सर्व सोयाबीन टीना पत्राच्या खाली आखाड्यावर ठेवण्यात आली होती परंतु अज्ञात चोरट्याने दोन ते तीन दिवसाखाली शिक्षकांच्या वडिलांना खाटेवरच बांधून सोयाबीन पळविली असल्यामुळे सदरचे अज्ञात चोरटे कुंटूर पोलीसाच्या रडावर असल्याचे सांगण्यात येत आहे
कुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत सावरखेड हे गाव आहे या गावापासून म्हणजे एक किलोमीटर अंतरावर कुंटूरकर शुगर कारखानाच्या पश्चिमेस गेल्या अनेक वर्षापासून येथे जागल असल्याने येथील शिक्षकांचे वडील शेतामध्येच राहतात आज पर्यंत या शेतामध्ये कसल्याच प्रकारची चोरी झाली नव्हती परंतु काही अज्ञात चोरट्यानी पांढरे २५ पोते भरलेले सोयाबीन घेऊन गेल्यामुळे त्यांची अंदाजी किंमत ६३ हजार १३७ रुपये एवढी बाजार भावा प्रमाणे असून पोलीस निरीक्षक विशाल बहातरे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार कुसमे यांच्यासह बीट जमादार आर टी पवार, अशोक घुमे सदरच्या घटनेचा तपास करीत आहेत

0 Comments