Header Ads Widget

बिलोलीच्या सम्राट बार जवळ अनोळखी पुरुषाचा नांदेडच्या शासकीय रुग्णालयात मृत्यू ओळख पटविण्याचे पोनि सोंडरे / मुद्देमवार यांचे आवाहन !!

               माधव पवार
नांदेड जिल्ह्याच्या बिलोली पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात असलेल्या सम्राट बार जवळ एका ६५ वर्षीय पुरुष जातीच्या व्यक्तीचे तब्येत खालावली असल्याने त्या अनोळखी व्यक्तीला बिलोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेशराव सोंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचाऱ्यांनी प्रथम बिलोली येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते

नांदेडच्या शासकीय रुग्णालयात रेफर केल्याच्या नंतर त्यांचा मृत्यू झाला असल्याचे ठाण्याचे पोलीस कर्मचारी मुदेमवार यांनी सांगितले आहे

बिलोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या नरसी ते बिलोली रस्त्यावर सम्राट नावाचे बार असून सदरचा इसम हा त्या ठिकाणी म्हणजे जवळपास बेशुद्ध अवस्थे मध्ये दिनांक १३ ऑक्टोंबर २०२३ रोजी पोलिसांना मिळून आल्याच्या नंतर ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश सोंडारे यांनी सदरच्या पुरुष जातीच्या इसमास बिलोलीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते

परंतु नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दिनांक दिनांक १९ ऑक्टोंबर २०२३ रोजी मृत्यू पावला असल्याची माहिती मुद्देमाल यांनी दिली आहे

बिलोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापडलेल्या ६५ वर्षीय व्यक्तीची कोणाला ओळख पटल्यास व त्यांच्या नातेवाईकांची माहिती असल्यास बिलोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश सोंडारे यांचा मोबाईल ९८२३८१५१२५ / ९५५२५१४५३२ या नंबर वर संपर्क करण्याचे बिलोली पोलिसांनी आवाहन केले आहे

सदरचे प्रयत्न शासकीय दवाखान्यातील वार्ड क्रमांक ३२ मध्ये शीतग्रहात ठेवण्यात आले असल्याचे मुद्देवार यांनी सांगितले आहे आहे 


Post a Comment

0 Comments