Header Ads Widget

कोठाला व दुगावच्या सीमेवर असलेल्या रस्त्या वरील अवैध देशी अड्डा तात्काळ बंद करा - कुंटूर पोलीसाना निवेदन !!

         माधव पवार
नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या मोजे कौठाळा व दुगाव सीमेच्या असलेल्या रस्त्यावर विनापरवाना चालत असलेली अवैध देशी दारूचा अड्डा तात्काळ बंद करण्यात यावे म्हणून गावातील सुज्ञान नागरिकांसह महिलांनी कुंटूर पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल बहातरे यांना दिनांक १ ऑक्टोंबर २०२३ रोजी निवेदन देऊन कळविले आहेतालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात असलेल्या कोठाळा हे गाव नायगाव सुजलेगाव औराळा या मार्गावर असल्यामुळे या ठिकाणी गेल्या सहा महिन्या पासून अवैध देशी दारूचा अड्डा थाटला असल्याने गावकऱ्यांनी दोन ते तीन वेळेस विना परवानगी देशी दारू बंद करण्याच्या संदर्भात संबंधित विक्री करणाऱ्याना सूचना केल्या होत्या असे निवेदन कर्त्यांनी सांगितले आहे

निवेदन कर्ते संताजी पाटील पांढरे,रामदास माली पाटील पाटील पांढरे,ज्ञानेश्वर पाटील बेंबरे ,काशिनाथ पाटील .पांढरे,शेषराव पाटील .पांढरे,शिवाजी पाटील .बेंबरे,बालाजी पाटील .बेंबरे, दिगांबर पाटील .पांढरे,चंद्रकांत पाटील .पांढरे,महेश पाटील पांढरे,समस्त गावकरी मंडळी व महीला पुढाकार घेतला आहे

बिलोलीच्या दारूबंदी अधिकाऱ्याच्या आशीर्वादामुळे ग्रामीण भागातील खेड्यापाड्यात विनापरवाना देशी दारू विक्री करत असताना सुद्धा सदरचे अधिकारी वरमाईत मग्न असल्यामुळे सदरच्या विनापरणा दुकानावर कारवाई करण्यासाठी टाळाटाळ करत असल्याचे स्पष्ट चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे 

कौठाळा गावातील सुज्ञान नागरिक व महिला यांनी दारू बंदी अधिकारी विना परवाना देशी दारू बंद करीत नसल्यामुळे अखेरचा पर्याय म्हणून कुंटूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे

 



Post a Comment

0 Comments