Header Ads Widget

मोजे पळसपुर येथील गावठाण विद्युत पुरवठा कमी दाबाने येत असल्यामुळे घरातील उपकरणे जळून मोठे नुकसान..

हिमायतनगर नागोराव शिंदे

तालुक्यातील मोजे पळसपुर गावातील गावठाण सिंगल फेज डीपी वरुण गावात होत असलेला विद्युत पुरवठा हा बऱ्याच दिवसापासून कमी दाबाने होत असल्यामुळे गावातील गावकऱ्यांच्या घरातील इलेक्ट्रॉनिक विद्युत उपकरणे जळून गावकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे.

या संबंधित कनिष्ठ अभियंता,लाईन मेन यांना वारंवार सांगून सुद्धा विद्युत पुरवठा सुरळीत करून दिला नाही,त्यामुळे गावकऱ्यांनी विद्युत पुरवठा सुरळीत करून दिला नाही तर सर्व विद्युत ग्राहकांना घेऊन लोकशाही मार्गाचा अवलंब करावा लागेल. त्यामुळे होणाऱ्या नुकसानाची जबाबदारी महावितरण विभाग राहील असे पळसपुर येथील ग्रामस्थांनी आपल्या निवेदनाद्वारे सांगितले.आहे 

यावेळी, रिपब्लिक २४न्यूज मुख्य संपादक देवानंद गुंडेकर, संपादक प्रशांत राहुलवाड, जेष्ठ पत्रकार नागोराव शिंदे,  ग्रामपंचायत सदस्य नागोराव वाघमारे  ग्रामपंचायतीचे कर्मचारी संजय वाडेकर, सतिश वाडेकर , हे उपस्थित होते तर निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत
दगडू रघुनाथ जाधव, संदीप शेषराव कदम, किशन मारुती बोंबीलवार, श्रावण बोंबीलवार, निर्गुण साहेबराव जाधव, सुनील विठ्ठलराव जाधव, विकास विलासराव सूर्यवंशी,

परमेश्वर बाबुराव वानखेडे, राजू दिगंबर कोमलवार, गणेश सूर्यभान पवार, देवानंद काशिनाथ वानखेडे, ओमकार लक्ष्मण मांजरे, सुरेश बाबुराव कदम, अनिल दिगंबर देवसरकर, तुकाराम चांदराव वानखेडे, अनंता धोंडबा माने, साहेबराव देवराव जाधव, शंकर मांजरे इत्यादी ग्रामस्थ विद्युत वितरण कंपनी कार्यालय हिमायतनगर येथे निवेदन देताना उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments