Header Ads Widget

पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पेट्रोलिंग करत असताना ऑटो मध्ये सापडली देशी दारू " मुद्देमालासह आरोपी ताब्यात

        माधव पवार
नायगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पेट्रोलिंग करत असताना पोलिसांना गोपनीय माहिती मिळाल्या नुसार एका ऑटो मध्ये अवैध देशी दारूची वाहतूक होत असल्याने एका इसमास पकडून अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांनी नायागांव फास्ट न्यूजला दिली आहे

पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात दिनांक ३ सप्टेंबर २०२३ रोजी ऑटो मध्ये देशी दारूचे अवैधरित्या वाहतूक करीत असताना पकडण्यात आलेल्या धाडीत आटोसह एकूण २५ हजार ९८० रुपयाची देशी दारू पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदरच्या आरोपीसह मुद्दे ताब्यात  घेण्यात आला आहे 

आटोच्या माध्यमातून विक्री करण्याच्या उद्देशाने चोरट्या मार्गाने वाहतूक करीत असताना कर्तव्यावर असलेले पो.हे.कॉ मस्तापुरे पॉपर बीट जमादार सोबत पो.कॉ पवार,पो कॉ नांदेवर,पो.कॉ शेरीकर असे तहसील कार्यलयाच्या जवळ जाऊन चोरटी वाहातुक करणाऱ्या अपे आटो थांबंवून त्यांची चौकशी केली असता एक इसम देशी दारूचे १४ बाटल सोबत आटो मधे वाहतूक करीत आसतांना मिळून आहे

पोलीसानी सदर इसमाचे नाव विचारले आसता त्याचे नाव शिवाजी माधव कुरे राहणार ताकबीड तालुका नायगांव असे सांगीतल्याने या इसमा विरुद्ध पोलीस ठाण्यात कलम ६५ ( ई ) म.दा. का.प्रमाणे दाखल झाला झाला आहे

देशी दारू व आटो असा एकूण २५,९८० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा तपास पो नि ओमाकांत चिंचोळकर यांच्या मार्गदर्शनखाली पो. हे. कॉ बीट जमादार मस्तापुरे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे




Post a Comment

0 Comments