Header Ads Widget

हिमायतनगर कडकडीत बंदची हक्क देण्यात आली सकल मराठा बांधवांनी जास्तीत जास्त संख्येत उपस्थित राहावे ..रामभाऊ सुर्यवंशी यांचे आवाहन

हिमायतनगर प्रतिनिधी : नागोराव शिंदे :-

हिमायतनगर तालुक्यातील सकल मराठा बांधवांच्या वतीने परमेश्वर मंदिरामध्ये बैठक आयोजित  करण्यात आली होती या बैठकीमध्ये उद्याला सोमवारी हिमायतनगर तालुका  सकाळ पासुन पुर्ण दिवस कडकडीत बंद ठेवण्याचे हक्क देण्यात आली आहे
ही लढाई मराठा  समाजाला आरक्षण  देण्या संदर्भामध्ये सरकारला  आरक्षण देण्यास भाग पाडण्यासाठी  आहे त्या करिता आपला हा बंद शांततेत कायदा सुव्यवस्था या कोणत्याही घटकाला तडा जाणार नाही असे डॉ राजेंद्र वानखेडे यांनी या बैठकीत याचा विचार करुन बंदच्या हाकला संपूर्ण समाज बांधव  जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे
जालना येथील आपल्या बांधवांवर जो लाठीचार्ज झाला त्याचा निषेध म्हणून आपण उद्याला हिमायतनगर तालुका पूर्णपणे बंद ठेवण्याचे आव्हानं केले त्या मध्ये व्यापारी  किराणा व्यापारी आरोग्य सोडून बाकी सर्व मार्केटणे बंद राहील या बदला सर्व सहकार्य करतील असे आव्हान सकल मराठच्या वतीने रामभाऊ सूर्यवंशी यांनी केले आहेयेणाऱ्या काळामध्ये जोपर्यंत मराठा आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत असेच  आदोलन चालू राहतील यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येतील याची देखील दखल प्रशासनाने घ्यावी त्याचबरोबर हदगाव हिमायतनगर तालुक्याचे आमदारराव पाटील जळगावकर यांची देखील या बैठकीला उपस्थिती होती त्यांनी मराठा समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत

असे यावेळी ते बोलत होते पहिले समाज नंतर राजकारण शब्दांमध्ये त्यांनी आपले मनोगत मानले विशेषतः या बैठकीला व समाज बांधव डॉक्टर वकील पत्रकार बांधव उपस्थित होते सकाळी  ४/९/२०२३  रोजी  सकाळी ९ वाजता  परमेश्वर मगलकार्याल्य हिमायतनगर येथे उपस्थित रहावे

Post a Comment

0 Comments