Header Ads Widget

राज्य सरकारचा जाहीर निषेध करण्यात येत असल्या प्रकरणी पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांना सकल मराठा समाजाच्या वतीने निवेदन


माधव पवार / मधुकर जवळे :-

राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी सकल मराठा
समाजाने दिनांक ४ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ठिक ८ वाजता नायगावच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात उपस्थित राहावे असे आवाहन सकल मराठा समाजाने केले आहे
जालना जिल्ह्यात मराठा समाजाच्या आरक्षणासाठी उपोषणास बसलेल्या आंदोलकावर तुफानी लाटी चार्ज झाल्यामुळे सरकारचा निषेध करण्यासाठी नायगाव तालुका बंद हक्क सकल मराठा समाजाने दिली आहे 
मराठा समाजाने आपल्या न्याय हक्कासाठी लोकशाही मार्गाने उपोषण करीत असताना व आरक्षणाचा मुद्दा लावून धरीत असताना सदरच्या करण्यात येत असलेल्या जालना येथे आंदोलका मध्ये घुसून पोलिसा कडून करण्यात लाठी चार्जमुळे सरकारचा जाहीर निषेध करण्यासाठी सकल मराठा समाज हा संताप व्यक्त आहे 

भारतीय राज्य घटनेनुसार व लोकशाही मार्गाने असल्याने नायगाव शहरात सरकारचा तीव्र निषेध करीत असल्यामुळे नायगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांना निवेदन देण्यात आले आहे 

बोट वाकडे कराल तर हात वाकडे केल्या जातील प्रा.रविंद्र चव्हाण यांचा प्रशासनाला इशारा  -
   
सरकारच्या निर्देशा नुसार जालना येथील मराठा बांधवांच्या मोर्चा वरती पोलिसांनी अमानुष लाठी चार्ज करून महिला मूल बाळ ज्येष्ठ मंडळी यांची डोकी फोडली त्यांच्यावर गोळीबार केला गोळीबार करण्याचा आदेश देणाऱ्या सरकारच्या महाराष्ट्रभर जाहीर निषेध करण्यासाठी सोमवारी नांदेड जिल्हा बंदची हाक सकल मराठा समाजाने दिली आहे

नायगाव तालुक्यातील मांजरम कुंटूर बरबडा नरसी या विभागातील सर्व मराठा बांधवांनी सहभागी व्हावे यासाठी नायगाव विधानसभा मतदारसंघाचे युवा नेते प्रा.रवींद्र पाटील चव्हाण यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात पूर्व नियोजित बैठकीला बंदच्या संदर्भामध्ये मार्गदर्शन करून सूचित केले आहे 



Post a Comment

0 Comments