Header Ads Widget

चाळीस वर्षाची पत्रकारिता अनुभव हीच खात्री ज्येष्ठ पत्रकार माधव मामा कोकुर्ले यांचा पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांच्या वतीने सत्कार

          माधव पवार
नांदेड जिल्ह्याच्या नायगाव पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष व दमदार पोलीस अधिकारी म्हणून परिचयात असलेले पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांची दिनांक ३ सप्टेंबर २०२३ रोजी दैनिक भास्करचे नायगाव येथील ज्येष्ठ पत्रकार माधव मामा कोकुर्ले यांनी चाळीस वर्षाची पत्रकारिता पूर्ण केली असल्यामुळे अनुभव हीच खात्री समजून पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांनी कोकुर्ले मामाचा भव्य सत्कार केला आहेनायगाव पोलीस ठाण्याचे सिंघम पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांनी ठाण्याचा पदभार स्वीकारण्याच्या नंतर नायगाव शहरासह पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात असलेल्या गावाकडे अतिशय लक्ष देऊन वातावरण शांतता मय ठेवत असल्याने व दमदार कामगिरी बजावत असल्याने ज्येष्ठ पत्रकार मामा कोकुर्ले यांच्या वतीने कोतकास्पद पोनि चिंचोलकर यांचे अभिनंदन केले आहे

पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांची ज्येष्ठ पत्रकार माधव मामा कोकर्ले यांनी सहज पोलीस ठाण्यात जाऊन भेट घेतली आहे

पोलीस निरीक्षक चिंचोलकर व जेष्ठ पत्रकार मामा कोकुर्ले यांनी विविध विषयावर चर्चा करीत असताना ज्येष्ठ पत्रकार मामा यांनी त्यांच्या चाळीस वर्षांच्या पत्रकारितेचा अनुभव पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांना सांगितल्याच्या नंतर अनुभव हीच खात्री समजून अशा ज्येष्ठ पत्रकारांचा सत्कार माझ्या पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात यावा या हेतूने हा भव्य सत्कार मी करीत आहे 


Post a Comment

0 Comments