महाराष्ट्र राज्यात एकीकडे मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा राजकीय नेते मंडळींना भेडसावत असला तरी नांदेड जिल्ह्याच्या बिलोली उमरी मुखेड लोहा कुंडलवाडी येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका लागल्यामुळे या निवडणुकी मध्ये विविध पक्षाचे मंडळी आपापले उमेदवार विजयी करून घेण्यासाठी सदरच्या निवडणुकीत खरच जोर लावणार का ? असा प्रश्न चर्चेला जात असला तरी मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न राजकीय पुढाऱ्यांपुढे येत आहे
जिल्ह्यातील काही गावांमध्ये राजकीय पुढार्यांना गावबंदी करण्यात आली असली तरी नेत्याची आपुलकी कार्यकर्त्यांना व कार्यकर्त्यांची आपुलकी नेत्यांना असल्यामुळे काँग्रेस पक्षासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भारतीय जनता पार्टी त्याच बरोबर शिवसेना हे प्रमुख पक्ष असल्यामुळे या राजकीय पक्षांच्या माध्यमातून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकी मध्ये सदरच्या नेते मंडळींनी आपापले उमेदवार रिंगणात उभे केले आहे
राज्यात मराठा समाजाच्या आरक्षणा बरोबर धनगर समाजाच्या बांधवाना सुद्धा आरक्षण मिळाले व एसटीचे प्रमाणपत्र म्हणून धरणे आंदोलने चालू आहेत या राज्यातील राजकीय नेत्यांनी कुठे तरी आरक्षणाचा मुद्दा बाजूला ठेवून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका जिंकण्यासाठी पक्षांतर्गत तयारी ठेवली असल्याचे वास्तव चित्र सध्याच्या परिस्थिती मध्ये होत असलेल्या बिलोली उमरी मुखेड लोहा कुंडलवाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकी वरून दिसून येत आहे

0 Comments