Header Ads Widget

नायगावात मुलीच्या निधनाने दुःखी झालेल्या पित्याने आत्महत्या करून आपली जीवन यात्रा संपवली


विशेष प्रतिनिधी : बाळासाहेब पांडे -


मुलीच्या अकस्मात मृत्यू पासून दुःखा त असलेल्या पित्याने सोमवारी दुपारी नायगाव शहरात ग्रामीण रुग्णालयाच्या पाठीमाघे मोकळ्या जागेत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.याघटनेचे वृत्त कळताच नायगाव पोलिसानी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला शवविच्छेदन करून प्रेत नातेवाईकाच्या ताब्यात दिले.

या बाबद सविस्तर वृत्त असे की नायगाव येथील महात्मा फुले कॉलनी येथे राहणारे प्रकाश गोविंद पोटफोडे वय 60 वर्ष हे आपल्या मुलीच्या आकस्मिक मृत्यू पासून दुःखात होते .सोमवारी सकाळी घरा बाहेर पढल्या पासून ते घरी आलेच नाहीत नातेवाईक यांनी शोध घेतला ते सापडले नाहीत.
 
ग्रामीण रुग्णालय नायगाव च्या पाठी माघे खरेदी विक्री संघाच्या बाजूला मोकळ्या जागेत फाशी घेतलेला इसम काही ग्रामस्थ यांच्या निदर्शनास आले त्या नंतर त्यांच्या घरच्या ना व पोलिसांना ही माहिती देन्यात आली. नायगाव बिटचे जमादार साईनाथ सांगवीकर यानी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व शवविच्छेदन करून प्रेत नातेवाईकाच्या ताब्यात दिले

पोटफोडे यांच्या पचात दोन मुले पत्नी सुना नातवंडे असा परिवार असून त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी नायगाव येथे अंत्य संस्कार करण्यात येणार आहेत.नायगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पो.नि.ओमकार चिंचोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे कॉ सांगवीकर हे अधिक तपास करीत आहेत.

Post a Comment

0 Comments