नांदेड जिल्ह्याच्या उमरी तालुक्यातील वाघलवाडा कारखान्यां अंतर्गत यावर्षी एमव्हिके प्रगतशील शेतकरी दादाराव पाटील गायकवाड आणि त्यांच्या सुविद्य पत्नी रहाटी ता उमरी यांच्या हस्ते पूजन तसेच डॉ.शंकराव चव्हाण जँगरी या यूनिटचे श्रीनिवासराव दिगांबरराव धर्माधिकारी बरबडेकर त्यांच्या सूविध्य पत्नी रा.बरबडा ता नायगांव या शेतकऱ्यांच्या हस्ते पुजन करण्यात आले आहे
वाघलवाडा येथील दोन कारखान्यांचा बॉयलर अग्नी प्रदीपन सोहळा शेतकरी नेते तथा व्हि.पि.के. उद्योग समूहाचे अध्यक्ष मारोतराव पाटील कवळे गुरुजी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला आहे
सदरील बॉयलर अग्नी प्रदीपन सोहळा प्रसंगी प.पू.यदुबन महाराज मठ संस्थान कोलंबी प पु राम भारती महाराज मोहनपुरा,प.पू.आनंदपुरी गुरुदत्त पुरी महाराज दत्त संस्थान चोळाखा शास्त्री बुवा बिजेगांवकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाला आहे
यावेळी कवळे गुरुजी यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना म्हणाले आपल्या परिसरातील शेतकरी एकरी 100 टन ऊस काढावा अशी माझी अपेक्षा आहे.येणाऱ्या काळात नक्कीच आपला परिसर सुजलाम सुफलाम होण्यास वेळ लागणार नाही.यासाठी तुमच्या साथची गरज आहे.नक्कीच शेतकरी माय बाप आपण दोघे मिळून येथे क्रांती घडवू आणि आपला विकास साधून घेऊ असा विश्वास व्यक्त केला आहे
यावेळी प्.पू.यदुबन महाराज, शास्त्री बुवा बिजेगांवकर,यांनीही आशिर्वाद रुपी मनोगत व्यक्त केले यांनीही आपले विचार मांडत यांचे कौतुक केले..
कोणती ही राजकीय पार्श्वभूमी नसणाऱ्या एका सर्वसाधारण कुटूंबातील युवक ते हजारों बेरोजगारांना उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध करून देणारा यशस्वी उद्योजक, सर्वसामान्यांच्या मनाला भिडलेला जनप्रिय नेता असा कवळे गुरुजींचा प्रवास सर्वांनाच अचंबित करणारा आहे

0 Comments