Header Ads Widget

अंतरवाली सलाटी यांच्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी नायगावच्या तहसील कार्यालय समोर सतीश पाटील कदम यांच्यासह गजानन पाटील कदम यांच्या अमरण उपोषणचा दुसरा दिवस - भाजपाचे दोन आमदार ?

         माधव पवार
जालना जिल्ह्यातील आंबड तालुक्यातील अंतरवाली सलाटी येथील आंदोलक मनोज जरांगे यांच्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी नायगावच्या तहसील कार्यालय समोर सतीश पाटील कदम यांच्यासह गजानन पाटील कदम यांच्या अमरण उपोषणचा दुसरा दिवस असताना सुद्धा कोणत्या राजकीय पुढाऱ्यानी अध्याप लक्ष दिले नाहीत त्या साठी सदरचे अमरण उपोषण तीव्र होण्याची शक्यता आहे 
जिल्ह्याच्या खासदारासह नायगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान भाजपाचे दोन आमदार ? मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात काही बोलती का ? अशा भावना उपोषणकर्त्यातून व्यक्त होताना दिसून येत आहे
अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी आंदोलन मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून उपोषण करीत आहेत परंतु राज्य सरकारने व राज्यकर्त्यांनी सदरच्या मराठा समाजाच्या आरक्षणाकडे व उपोषणाकडे जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहेत

मराठा समाजाला अत्यंत आरक्षणाची गरज असल्याने नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तहसील कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्ते सतीश रामचंद्र पाटील कदम यांच्यासह गजानन शिवाजी पाटील कदम हिप्परगेकर दिनांक ६ सप्टेंबर २०२३ पासून आमरण उपोषण करत आहे
राज्यातले राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्याचा आदेश लवकर पारित करावा आणि जालना जिल्ह्यातील मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणा पाठिंबा देण्यासाठी नायगावच्या तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करत असल्याचे निवेदन नायगावच्या तहसीलदार मनीषाताई भगत यांना देण्यात आली आहे

जिल्ह्यातील नायगाव तहसील कार्यालय समोर करण्यात येत असल्याने अमरण उपोषण जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तो पर्यंत सदरचे उपोषण अधिक तीव्र करण्याचा निर्णय नायगाव तालुक्यातील हिपरगा येथील सामाजिक कार्यकर्ते सतीश पाटील कदम व गजानन पाटील कदम यांनी नायगाव फास्ट न्यूजशी बोलताना सांगितले आहे 

Post a Comment

0 Comments