Header Ads Widget

बिलोली पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात असलेल्या बामणीच्या पाझर तलावात पोहण्यासाठी गेलेल्या तीन मुलांचा पाण्यात दुर्दैवी बुडून अंत पोलीस निरीक्षक सौंडारे यांची माहिती

        माधव पवार
नांदेड जिल्ह्याच्या बिलोली पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात असलेल्या बामणी येथे  दिनांक २८ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी साडे ८ वाजण्याच्या दरम्यान एकूण ४ मुले शौचालयासाठी गेले होते त्या ठिकाणी  पाझर तलाव जवळ असल्याने अंधोळ करण्यासाठी व पोहण्यासाठी गेले असल्याचे सांगण्यात आले आहे

नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्यासह बिलोलीच्या तहसील प्रशासनाने बामणी येथील पाझर तलावात बुडून मृत्यू पावलेल्या मुलाच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच पाच लाख रुपये आर्थिक मदत तात्काळ करावी अशी मागणी जन सामान्य माणसातून केल्या जात आहे 
यापैकी तिघे जण जवळच असलेल्या एका पाझर तलावामध्ये पोहण्यासाठी गेले असता त्यांना पाण्याचा अंदाज न लागल्यामुळे ३ मुलाचा पाण्यात बुडून करून दुर्दैव अंत झाल्याची दुर्दैवी घटना बामणी येथे घडली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक गणेश सोंडारे यांनी नायगाव फास्ट न्यूजशी बोलताना दिली आहेबिलोली तालुक्यातील मौजे बामणी येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेमुळे गावात व तालुक्यात शोककळा पसरली असून सदरील दुर्दैवी घटनेची माहिती बिलोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश सोंडारे यांना कळताच बीट जमादार प्रभाकर गुडमलवार यांच्यासह पोलीस घटनास्थळी रवाना होऊन सदरच्या घटनेची पाहणी करून पंचनामा केला असल्याचे पो.नि. सोंडारे यांनी सांगितले आहे 

पोलीस ठाणे बिलोली हद्दीत मौजे बामणी येथे पाझर तलावात दिनांक २८ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी अंदाजे ८ ३० ते ९ चे दरम्यान चार मुलं मुलं संडाससाठी आले असता त्यापैकी तिघेजण तलावात आंघोळ करण्यासाठी गेले होते  तिघे जण पाण्यात बुडून मरण पावले आहेत

बामणीच्या तलावातील दुर्दैवी घटनेतील मृत्यू पावलेल्या मुलाचे नावे देवानंद पिराजी गायकवाड वय १५ वर्ष बालाजी पिराजी
गायकवाड वय १२ वर्ष वैभव पंढरी दुधारे वय १५ वर्षे असे आहेत असे पोलीस निरीक्षक सोंडारे यांनी सांगितले आहे 


Post a Comment

0 Comments