नायगाव तालुक्यातील व बिलोली तालुक्यातील कोळी महादेव या जमातीच्या मुला मुलींना जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी प्रशासन चाल ढकल करत असल्यामुळे कोळी महादेव या जमातीवर अन्याय होत असल्यामुळे शासन आपल्या दारी
या योजनेचा नुसता बोजवारा झाला आहे
या योजने अंतर्गत प्रत्येक कुटुंबाला जातीचे प्रमाणपत्र देण्याचे स्पष्ट आदेश असताना देण्यात येत नाहीत ते तात्काळ देण्यात यावे अन्यथा बिलोलीच्या उपविभागीय कार्यालया समोर आत्मदहन करण्याचा पत्रकार देविदास जेट्टवाड यांनी इशारा दिला आहे
नायगाव तालुक्यातील मौजे बरबडा येथील पत्रकार देविदास जेट्टेवाड यांनी अनुसूचित जमाती मधील कोळी महादेव या जातींच्या समाजाला प्रमाणपत्रा पासून वंचित ठेवत असल्याचा आरोप केला असून कोळी महादेव मुला मुलींना शिक्षणा पासून व शासकीय योजना पासून दूर वं राहावे लागत असल्याचे त्याचे म्हणे आहे
कोळी महादेव कोळी मल्हार समाज संघटनेचे नायगाव तालुका अध्यक्ष तथा बहुजन समाज पार्टी नायगाव विधानसभा प्रभारी देविदास जेठेवाड यांनी दिनांक २९ सप्टेंबर २०२३ रोजी बिलोलीच्या उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालया समोर अंदाजे एक दरम्यान आत्मदहन करणार असल्याचे निवेदन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना दिले आहे

0 Comments