नांदेड जिल्ह्याच्या नायगाव येथे मोठी बाजारपेठ असल्यामुळे या ठिकाणी व्यापार करण्यासाठी तीन ते चार राज्यां मधून व्यापारी मोठ मोठाले येतात सदरचे ठिकाण हे नांदेड ते हैद्राबाद राज्य महामार्गावर असल्यामुळे नांदेड जिल्ह्यातील पहिल्या क्रमांकाची बाजार पेठ आहे
या ठिकाणी दिनांक २८ सप्टेंबर २०२३ रोजी गणेश उत्सवाच्या निमित्ताने नायगावचा बाजार नगरपंचायत प्रशासनाने बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे
नायगाव शहरात श्री गणेशाच्या मिरवणुकीसह विविध ठिकाणी काही अडचण निर्माण होऊ नये म्हणून सदरची बाजारपेठ बंद करण्यासाठी नगरपंचायत प्रशासनाने छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांनी बाजारासाठी येऊ नये असे आवाहन केले तर शहरातील वाहतूक मिरवणुकीसाठी सुरळीत ठेवण्यासाठी नायगाव पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे
पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक जयप्रकाश गुट्टे यांच्यासह तीन पोलीस अधिकारी पोलीस स्टेशनचे २० पोलीस कर्मचारी होमगार्ड ३० प्रशिक्षणार्थी पोलीस शिपाई १५ एसआरपीएफचे एक पलटून असा पोलीस फोर्स गणेश विसर्जनाच्या दिवसी लावण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक गुट्टे यांनी चौख बंदोबस्त लावला आहे

0 Comments