नायागांव येथील युवा नेतृत्व गजानन शंकरराव पाटील चव्हाण नायगाव यांच्या जनसंपर्क कार्यालय येथे महाराष्ट्र गाव कामगार पोलीस पाटील संघाच्या नायगाव तालुका अध्यक्षपदी निवड भागवत गोविंदराव पाटील भुताळे तर कार्याध्यक्षपदी हनुमंत पाटील खंडेजोड तसेच बिलोली तालुका अध्यक्षपदी श्री अरविंद पाटील शिंदे नागणीकर यांची निवड झाल्याने त्यांचा सत्कार सन्मान करण्यात आला आहे
महाराष्ट्र गाव कामगार पोलीस पाटील महासंघाचे अध्यक्ष मा बाळासाहेब शिंदे व जिल्हाध्यक्ष भास्कर कंकाळे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पुणे रांजणगाव या ठिकाणी निवड करण्यात आली होती हि निवड झाल्या बद्दल नायगाव विधानसभा मतदारसंघाचे युवा नेतृत्व गजानन पाटील चव्हाण यांनी त्यांना शुभेच्छा देत प्रास्ताविक मध्ये आपले मनोगत व्यक्त केले आहे
नायगाव मतदारसंघासह नांदेड जिल्ह्यातील अनेक गावे पोलीस पाटील पद रिक्त असल्याने नांदेड जिल्ह्याचे जिल्हा दंड अधिकारी साहेब यांना भेटून निवडीच्या पाठपुराव्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले आहे
या सत्कार सन्मान सोहळ्यास प्रमुख उपस्थिती ज्येष्ठ मार्गदर्शक भाऊराव पाटील चव्हाण नायगाव तालुक्यातील पोलीस पाटील जयराज पाटील शिंदे, विजयकुमार होनराव, शरद पाटील पवार गोळेगावकर, सत्तार पठाण, सुपारे पाटील, मारुती पाटील, बालाजी अल्लेवाड, सुभाष वारघडे, शेवाळे पाटील, निरंजन पुरी, मधुकर जाधव, भीमराव सोनकांबळे, दत्तात्रेय नारे आदी उपस्थित होते
यावेळी अशोक पाटील पवार शिवाजी पाटील चव्हाण प्रल्हाद भाऊ भंडारे श्रीनिवास पाटील मुर्के माधव वाघमारे प्रमोद बिरेवार किरण पाटील मोरे श्रीनिवास पाटील देगाव सह शुभेच्छा देण्यासाठी नायगाव मतदारसंघातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

0 Comments