राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व.वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत महावि्यालय नायगाव बाजार येथील सातव्या सत्रातील रावे विद्यार्थीनी ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम आणि कृषी औद्योगिक संलग्नता उपक्रमा अंतर्गत मौजे. खैरगांव, येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा केला१५ ऑगस्ट २०२३ रोजी स्वातंत्र्याचा ७६ वर्ष पूर्ण झाली आहेत या निमित्ताने देशभर अमृत महोत्सव आनंदाने साजरा केला जात आहे . याचे औचित्य साधून वसंत रोपवाटिका , कृषी महाविद्यालय नायगाव च्या वतीने विविध प्रकारच्या झाडांची रोपे गावांमध्ये वृक्षा रोपणासाठी रावे विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आली .
विद्यार्थ्यांच्या वतीने गावामध्ये वृक्षदिंडी ,वृक्षारोपण ,विद्यार्थ्यांना खाऊ वाटप कार्यक्रम, इत्यादी उपक्रम राबविण्यात आले.
या कार्यक्रमासाठी गावचे सरपंच सय्यद मेहताब शमशोदिन व उपसरपंच माधवराव मारोतराव शिंपाळे , माजी सरपंच वसंतराव नागोराव जाधव पाटील , ग्रामपंचायत सदस्य जि. प. प्राथमीक शाळा खैरगांव शिक्षक व इतर कर्मचारी , प्रतिष्ठित नागरिक व ग्रामसेवक , शेतकरी उपस्थित होते .
हा उपक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी गवारे प्रतिभा जाधव शिवानी चव्हाण वैष्णवी योगिता गंगने दीक्षा भदरगे ऋतुजा कांबळे प्रियंका जमदाडे ऋतुजा कोंडेवार, श्रुती क्षीरसागर , सेजल देशमुख , स्वाती कदम, ऋतुजा कपाळे, श्वेता डोंगलिकर , अनुपमा कोवे पुजा कोकणे , सुप्रिया कोर्टपल्लली , जे. वसुधा , नेहा भरकड . नायगांव (बा.) कृषी महाविद्यालयातील या सर्व कृषी कन्यांनी अथांग परिश्रम घेतले.
तसेच सदरील कार्यक्रम एज्युकेशन सोसायटी नायगांव (बा.) सचिव श्री रवींद्र वसंतराव चव्हाण , श्री रमेश लव्हेकर , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर रमेश नादरे , रावे कार्यक्रम समन्वयक प्रा. शंकर नागणीकर , रावे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. माधवी जंगिलवाड आदी यावेळी उपस्थित होते
यावेळी प्रा. डॉ.शरद शेंडगे , प्रा. दुर्गा चाटसे , विषय तज्ञ संभाजी तळणे व आचल शंभरकर , डॉ. प्रा. तोटेवाड , प्राचार्य पोमदे सर मार्गदर्शनाखाली यशस्वी रित्या कार्यक्रम पार पाडलाआहे .

0 Comments