Header Ads Widget

सिंघम पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांच्या कर्तव्यांची जेष्ठ नागरिकांनी घेतली दखल - म्हणे साहेब तुमच्या कर्तव्याला सलाम !!

         माधव पवार
नांदेड जिल्ह्याच्या नायगाव येथील पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांनी ठाण्याचा पदभार स्वीकारल्याच्या नंतर त्यांच्या कर्तव्याच्या माध्यमातून करत असलेल्या कारवाह्या बरोबर त्यांच्या कर्तव्याची जाण ठेवून नायगावच्या ज्येष्ठ नागरिकांनी ठाण्याचे पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांची महत्त्वाची भेट घेऊन साहेब तुमच्या कर्तव्याला सलाम म्हणून विशेष चर्चा केली असल्याची माहिती आहेजिल्ह्यातील नायगाव पोलीस ठाण्याचे सिंघम म्हणून पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांची जनसामान्य माणसाला ओळख झाली व हुलटबाजी करणाऱ्या टूकार खोराच्या मात्र उरात धडकी बसली असल्याची चर्चा ग्रामीण भागात शहरात ऐकावयास मिळत आहे

पोलीस खात्यातील पोलीस अधिकारी आपल्या कर्तव्याची जाण ठेवून कर्तव्य बजावत असल्यामुळे पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांच्या सोबत नायगावच्या ज्येष्ठ नागरिकांनी पोलीस ठाण्यात जाऊन पोनि यांची भेट घेतली व अतिशय महत्त्वाची चर्चा केली आहेनायगाव पोलीस ठाण्याचा नुकताच पदभार स्वीकारलेले पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली  ठाण्यातील पोलीस कर्मचारी मोठ्या प्रमाणात दमदार कामगिरी बजावत असल्याने नागरिकांत समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे

अनुभव सागर जेष्ठ नागरिक मंच संघटनेच्या वतीने पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांची दिनांक २६ ऑगस्ट २०२३ रोजी भेट घेऊन त्याचे अनुभव सांगितले आहे
अनुभव सागरचे निर्माते सोपानराव देगावर व ज्ञानेश्वर शिंदे यांच्या संकल्पनेतून सदरची निर्मिती करण्यात आली असून सदरच्या सागर अनुभव जेष्ठ नागरिक मंचचे माजी प्रचार्य शंकरराव आजनिकर, माजी प्रचार्य ह.स. खंडगावकर, भाऊराव मोरे, माणिकराव हंगरगे, ज्ञानेश्वर शिंदे,सोपानराव देगावकर, बजरंग जाजू आदी यावेळी उपस्थित होते 

पोनि चिंचोलकर यांच्या कडून त्याचे ठाण्यात येऊन त्याचा अनुभव प्रकट केल्यामुळे त्याचे चिंचोलकर यांनी धन्यवाद दिले आहे 

एक जबादार पोलीस अधिकारी म्हणून कायदा हे नायगाव शहरात दाखवून देण्याचे काम पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांनी करत असल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी त्यांची भेट घेऊन अभिनंदन केले आहे 

Post a Comment

0 Comments