Header Ads Widget

शेतकऱ्यांनी पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे विद्युत वितरण कंपनीच्या खांबाला कोणी ही हात लावू नये - सहाय्यक अभियंता ज्ञानेश्वर जाधव यांचे आवाहन

        माधव पवार
नायगाव तालुक्यातील कृष्णूर युनिट अंतर्गत असलेल्या बावीस गावातील शेतकऱ्यांनी सध्याच्या परिस्थिती मध्ये पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे आमच्या लाईनमन कर्मचाऱ्यांच्या व्यतिरिक्त कोणत्या ही शेतकऱ्यांनी व इतरांनी विद्युत वितरण कंपनीच्या खांबाला स्पर्श करू नये अर्थात हात लावू नये असे कर्तव्यदक्ष सहाय्यक अभियंता ज्ञानेश्वर जाधव यांनी नायगाव फास्ट न्यूजशी बोलताना आवाहन केले आहे

तालुक्यातील कृष्णूर युनिट अंतर्गत एकूण बावीस गावे आहेत या सर्व गावां मध्ये विद्युत वितरण कंपनीचे लाईन मेन कर्मचारी चांगल्या प्रकारे काम करत असल्यामुळे त्यांच्या व्यतिरिक्त लोखंडी खांब असो की सिमेंटचा खांब असो या खांबात लाईट उतरण्याची शक्यता असल्यामुळे कोणत्याही शेतकऱ्यांनी खांबाला हात लावू नयेत असे सूचना करण्यात आल्या आहेत 

कृष्णूर युनिट अंतर्गत गावातील शेतकऱ्यांनी लाईमना शिवाय आपला स्वतःचा जीव धोक्यात घालू नये असे महत्वाचे आवाहन कर्तव्यदक्ष सहायक अभियंता ज्ञानेश्वर जाधव यांनी दिनांक १ जुलै २०२३ रोजी केले आहे

सदरच्या कृष्णूर युनिट अंतर्गत असलेल्या २२ गावां मध्ये विद्युत पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी व करण्यासाठी आमचे कर्मचारी सक्षम असल्यामुळे आपल्या कडील थकबाकी असलेली त्वरित भरून विद्युत वितरण कंपनीला सहकार्य करावे आणि त्याच बरोबर लाईनमना मार्फतच विद्युत वितरणचे कामे करून घ्यावेत असी अतिशय महत्वाची सूचना करण्यात आली आहे

कृष्णूर शाखे अंतर्गत बावीस गावातील वीज ग्राहकांना आणि शेतकऱ्यांना कृष्णूरचे सहाय्यक अभियंता जाधव याचे असे आवाहन की सध्या पावसाळाचे दिवस आहेत तरी सर्व वीज ग्राहकांनी शेतात काम करत असताना विजेच्या खांब उगड्या तारा डी पी याच्याशी संपर्क टाळावे तसेच शेतात आपल्या मोटारीचे किंवा विजेवरचे उपकरणे व्यवस्थित हाताळावे असे कळविण्यात आले आहे 

शेतकऱ्यांनी कोणत्याही खांबावर जाऊन कनेक्शन जोडणे गोळा लावणे डियो टाकणे आधी कामे लाईनमना शिवाय कोणी ही करू नयेत असे महत्त्वाची सूचना कृष्णूर युनिटचे सहाय्यक अभियंता ज्ञानेश्वर जाधव यांनी केली आहे

गावात किंवा शेतात पावसामुळे विजेची अडचण असल्यास आपण कोणत्याही गोष्टी ला हात न लावता , त्वरित आपल्या गावच्या लाईनमेन शी संपर्क साधावा...
तसेच पावसामुळं विजसेवा करताना अनंत अडचणीना सामोरे जाऊन आमचे कर्मचारी कर्तव्य पार पाडत असतात त्याच बरोबर आपण आपल थकबाकी आणि चालू वीज बिल भरून महावीतला सहकार्य करावे.

आपल्या घरातील विजेवरचे सर्व उपकरणे व्यवस्थित हाताळावे आणि आपल्या घरासमोर विजेचे खांब ताराशी संपर्क करू नयेत असे आवाहन करण्यात आले आहे 



Post a Comment

0 Comments