Header Ads Widget

राजकीय पुढाऱ्यासह प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे खडकी ते पावनमारी रस्त्याची बे कंगाल अवस्था वृद्ध महिलेस खांद्यावर घेऊन पाच किलो मीटर करावी नातेवाईकाना कसरत - माणसं मेल्यावरच रस्ता करणार का ? जनतेचा संताप जनक सवाल !!


हिमायतनगर : नागोराव शिंदे - 

नांदेड जिल्ह्याच्या हिमायतनगर तालुक्यात राजकीय
पुढाऱ्यासह प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे खडकी ते पावनमारी रस्त्याची बे कंगाल अवस्था झाली आहे

एका वृद्ध महिलेस तिचे नातेवाईक रस्त्याची बेकांगाल अवस्था झाली असल्यामुळे वाहने रस्त्यावरून जात नसल्याने सदरच्या महिलेला खांद्यावर घेऊन पाच किलो मीटर नातेवाईकाना कसरत करावी लागली असल्यामुळे या भागातील माणसं मेल्या वरच रस्ते करणार का ? जनतेतून संताप व्यक्त केला जात आहे
हिमायतनगर तालुक्यातील खडकी ते पावनमारी रस्त्याची दयनीय अवस्था झाली असताना सुद्धा या विभागातील लोकप्रतिनिधी व प्रशासन या रस्त्याकडे दुर्लक्ष केले असल्याने सदरच्या नागरिकांवर अशा पद्धतीची वेळ येऊन ठेपली आहे  

राजकीय पुढारी व प्रशासन गांभीर्याने लक्ष देत नसल्याने हा सदरचा रस्ता संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यानी तात्काळ दुरुस्त करावा अशी मागणी या भागातील नागरिकांतून होत आहे
तालुक्यातील खडकी ते पावनमारी रस्ता हा नादुरुस्त झाला असल्याने सदरच्या महिलेला रुग्णालयात घेऊन जात असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर झळकताच नायगाव फास्ट न्यूजने हे दखल घेऊन सदरची ऑनलाईन बातमी प्रकाशित केली आहे

या विभागाचे खासदार व आमदार यांची प्रशासनावर वचक नसल्यामुळे प्रशासनातील अधिकारी मोकाटपणे फिरत असताना दिसत असले तरी ह्या सदरच्या रस्त्याकडे लक्ष देण्यास तयार नसल्यामुळे सदरच्या संबंधित अधिकाऱ्यांची खासदार व आमदार कान उघडी करतील काय असा संताप जनक सवाल जनतेतून केला जात आहे 


Post a Comment

0 Comments