नायगाव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रुई बु येथील शाळेत शिक्षण घेणाऱ्या दोन विद्यार्थी घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झाल्यामुळे शिष्यवृत्ती पात्र झाल्याने त्यांचा दिनांक १५ जुलै २०२३ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रुई बु येथे शिष्यवृत्ती धारक विद्यार्थिनीचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे
तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रुई बु
यामध्ये शिष्यवृत्तीधारक असलेली कुमारी श्रद्धा प्रभाकर कानोले हिचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला असून त्याच बरोबर शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेली विद्यार्थिनी कुमारी माहेश्वरी दत्ता जाधव हिचा सुद्धा या प्रसंगी गावकऱ्यांच्या वतीने व शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला असून दोन्ही विद्यार्थिनीचे पालक दत्ता पाटील जाधव व प्रभाकर पाटील कानोले हे उपस्थित होते
गावातील इतर प्रतिष्ठित नागरिक सुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित होते या कार्यक्रमासाठी गावकऱ्यांनी सुद्धा शाळेतल्या सर्व शिक्षकांचा सत्कार केला त्यामध्ये सर्वप्रथम शाळेचे मुख्याध्यापक रामा गंगाधर कोठेवाड यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला त्यानंतर शाळेच्या शिक्षिका शोभा गंदलवाड व शाळेतील पदवीधर शिक्षक बालाजी बासटवार यांचा सुद्धा यावेळी गावातील पालकांच्या वतीने सत्कार करण्यात आला आहे
सुमारे २३ ते १५ वर्षा नंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक झाल्याने सर्व शाळेत व शाळेतून व गावातून आनंद व्यक्त केल्या जात असून सर्व माध्यमातून विद्यार्थिनी वर अभिनंदन याचा वर्षाव केल्या जात असून यावेळी दत्ताराम पाटील वडजे माजी सरपंच गजानन पाटील शिंदे माधव गांगतिरे पंढरी गंगातिरे उत्तम पिंपळे गोविंद पाटील शिंदे गजानन गंगातिरे सौ द्वारकाताई शिंदे आदी यावेळी नागरिक उपस्थित होते

0 Comments