Header Ads Widget

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या शेतातील पिके हरणाच्या तावडीत उधवस्त - बंदोबस्त करा शेतकऱ्याची मागणी

              माधव पवार
नायागांव तालुक्यासह ग्रामीण भागतील शेतकऱ्यांच्या शेतातील थोडे फार जमिनीच्या वर आले असताना वन परीक्षेत्राच्या कार्यक्षेत्रात असलेल्या छोटया मोठया जंगलातील रोही व हरीण निळ अशा जंगली प्राण्यानी शेतकऱ्यांच्या शेतातील खाऊन उड्या मारून उधवस्त करीत असल्यामुळे शेतकरी हैराण होताना दिसून येत आहे

तालुक्यातील शेतकऱ्याच्या पेरण्या पावसाने विलंब लावल्यामूळे पेरण्या खोळबंल्या होत्या तूरळक पावसात शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या असल्या तरी शेतकऱ्यावर अनेक ठिकाणी व काही भागात दुबार पेरणी संकट शेतकऱ्यावर आले असतानाच काही भागात शेतकऱ्याच्या शेतातील निघालेल्या पिकाची हरणाच्या काळ पासून बचाव कसा करायचा असा गंभीर प्रश्न शेतकऱ्या समोर उभा आहे

ग्रामीण भागातील शेतकरी अगोदर आर्थिक संकटात सापडला असताना वनपरीक्षेत्र अधिकारी देगलूर व बिलोली यांच्या सांबंधित असलेल्या विभागातील हरण व रोही निळ रान डुक्कर कोल्हे खेकड कोल्हे मोर आदी प्राण्याचा बंदोबस्त करण्यासाठी या विभागाच्या अधिकाऱ्यानी काही तरी उपाय करावा आणि शेतकऱ्यांच्या शेतातील होत असलेल्या पिकाचे तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे

Post a Comment

0 Comments