माजी मंत्री तथा खा.दिवंगत गंगाधरराव देशमुख कुंटूरकर यांची रुई बु.येथे शांतिनिकेतन विद्यालय असल्यामुळे त्याच बरोबर जिल्हा परिषद प्रार्थमिक शाळा असल्याने या ठिकाणी शांतिनिकेतन विद्यालयाचे मुख्याध्यापक बन्नाळीकर व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक कोठेवाड यांच्यात आपापली शाळा टिकविण्यासाठी मोठी रसिखेच खेळल्या जात असल्याचे वास्तव चित्र रुई बु.येथे दिसून येत असले तरी गावकऱ्यांच्या बेजबाबदारपणा जिल्हा परिषदकडे शाळेकडे दुर्लक्ष झाले आहे
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांचे ग्रामीण भागातील जिल्हा परिषद प्रार्थमिक शाळेकडे साफ दुर्लक्ष झाल्यामुळे शाळेचा शिक्षणाचा दर्जा वाढण्या ऐवजी मोठ्या प्रमाणात अवकळा होत असल्याचे वास्तू चित्र ग्रामीण भागात दिसून येत असले तरी सदरच्या शाळा स्पर्धेच्या युगात टिकून ठेवण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी जास्तीचे लक्ष द्यावे अशी विद्यार्थ्यांच्या पालकांची मागणी आहे
नायगाव तालुक्यातील शांतिनिकेतन विद्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रुई बु.येथे या दोन्ही मुख्याध्यापकां मध्ये दरवर्षी शाळा टिकून ठेवण्यासाठी विद्यार्थ्यांना गच्च पकडून ठेवल्या जाते परंतु शांतिनिकेतन विद्यालयाला विद्यार्थ्यांची संख्या कमी पडत असल्यामुळे त्या शाळेचा डोळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेकडे असल्याचे ही दिसून येत आहे
तालुक्यातील शांतीनिकेतन विद्यालय ही पाचवी ते दहावी पर्यंत असून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ही पहिली ते सातवी पर्यंत सन १९७९ शाळा कायम असून याच ठिकाणी शांतीनिकेतन प्राथमिक शाळा ही पहिली ते चौथी पर्यंत असल्यामुळे जिल्हा परिषद व प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी दोन्ही शाळेच्या मुख्याध्यापकांना मोठी तारेवरची कसरत करावी लागते सध्याच्या परिस्थिती मध्ये शांती निकेतन विद्यालयाला विद्यार्थ्याचे संख्या बळ कमी असल्यामुळे जिल्हा परिषद शाळेकडे सदरच्या विद्यालयाचा डोळा असल्याचे दिसून येत आहे

0 Comments