विशेष प्रतिनिधी : बाळासाहेब पांडे :-:
आगामी काळातील जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीची पार्श्वभूमी लक्षात घेऊन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशान्वये राज्यातील गाव पातळीवरील पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी नुकतीच नरसी येथील शिवसेनेच्या संपर्क कार्यालयात नायगाव ता.प्रमुख रवींद्र भिलवंडे यांच्या पिढकरातून जिल्हा प्रमुख प्रमोद खेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुक्यातील सर्व शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न झाली.
या आढावा बैठकीप्रसंगी पक्षाने दिलेली जबाबदारी ही जन सेवेची संधी समजून सर्व पदाधिकाऱ्यांनी कठोर परिश्रमाने समाजातील सर्व घटकांशी समन्वय साधत शिवसेनेच्या धगधगत्या मशालीने परिसर समृद्ध करण्यासाठी कटिबद्ध राहीले पाहीजे अशीही भुमिका जिल्हा प्रमुख प्रमोद खेडकर यांनी मांडली आहे
शिवसेना तालुकाप्रमुख रवींद्र भिलवंडे यांनी आपल्या प्रभावी प्रास्ताविक मनोगतात नरसी हे गाव दक्षिण नांदेड जिल्ह्याचे केंद्र स्थानी असलेले व मध्य वर्ती ठिकाण असून येथील बैठक म्हणजे दक्षिण नांदेड जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढवणारी ठरणार आहेअसे स्पष्ट संकेत दिले आहे
नरसी फाटा शिवसेनेच्या आढावा बैठकीवेळी तालुका प्रमुख रवींद्र शिवाजी भिलवंडे यांनी सखोल मार्गदर्शन केले.नायगाव तालुक्यात राबविण्यात येणाऱ्या आगामी लक्षवेधी सामाजिक उपक्रमांची मुद्देसुद माहिती त्यांनी दिली.
या वेळी जिल्हा संघटक विजय मुंडकर, उपजिल्हाप्रमुख गणेश गिरी, मारोती भागानगरे, संतोष देशमुख, नायगाव तालुका प्रमुख रविंद्र भिलवंडे, उमरी तालुका प्रमुख बालाजी सावंत, तालुका संघटक राजेश लगंडापुरे, मारोती कागेरू, भागवत शिंदे, गौरव कोडगिरे, रवी हाटकर, नायगाव शहरप्रमुख गजानन तमलुरे, बालाजी माली पाटील, शिवाजी शिंदे, रावसाहेब वडजे, रामदास पवार, नागेश पाटील, प्रभाकर मेघळ, बालाजी कुरे, ईरफान बेग, शंकर नरसीकर, शेख अजहर शेख तनु व असंख्य शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.

0 Comments