हिमायतनगर तहसील कार्यालयात एकूण १४ पदे रिक्त असल्यामुळे जनतेचे कामे रेंगाळत आहेत या तहसील कार्यालयात मंजूर पदे ५९ तर कार्यरत पदे ४५ व एकूण १४ पदे कर्मचाऱ्याचें रिक्त असल्यामुळे कधी शासन कधी भरणार असा सवाल जनतेनी केला आहे
तालुक्यातील गावची संख्या मोठया प्रमाणात असल्यामुळे जनतेला कामे करुन घेण्यासाठी विलंब लागत असल्यामुळे शासनाने तात्काळ रिक्त पदे भरून जनतेची गैरसोय टाळावी असी मागणी जनतेतून केल्या जात असून या मुळेच शासन आपल्या दारी कार्यक्रमाचा ग्रामीण भागात खेळखंडोबा होताना दिसून येत आहे
तहसील कार्यालयातील रिक्त पदे नायब तहसीलदार मंजूर पदे ३ तर कार्यरत २ आणि रिक्त एक अव्वल कारकून मंजूर पदे ४ कार्यरत ४ रिक्त जागा नाही महसूल सहाय्यक मंजूर पदे ८ तर कार्यरत ७ रिक्त १ जागा मंडळधिकारी मंजूर पदे ३ तर कार्यरत २ आणि रिक्त १ जागा तलाठी एकूण मंजूर पदे १८ तर कार्यरत १३ आणि ५ जागा रिक्त आहेत
शिपाई मंजूर ४ जागा कार्यरत ४ जागा रिक्त नाही कोतवाल एकूण मंजूर जागा १८ तर कार्यरत १३ आणि रिक्त ५ जागा शासकीय वाहन चालक जागा एक रिक्त पद नाही सदरच्या जागा शासनाने तात्काळ भरून गैरसोय टाळावी असी मागणी जनतेतून जोर धरित आहे

0 Comments