Header Ads Widget

नायगाव तालुक्यात मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या शेतातील पिके वाहून गेले असल्याने त्यांना तात्काळ आर्थिक मदत जाहीर करावी प्रताप पाटील सोमठाणकर यांची मागणी

            माधव पवार
नायगाव तालुक्यातील व ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या शेतातील पिके मुसळधार पावसाने खरडून गेली असल्यामुळे नायगावच्या तहसीलदार मंजुषाताई भगत यांनी तात्काळ शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी म्हणून दिनांक २२ जुलै २०२३ रोजी छावा संघटनेचे नायगाव तालुका अध्यक्ष प्रताप पाटील सोमठाणकर निवेदन देणार असल्याचे नायगाव फास्ट न्यूजशी बोलताना सांगितले आहे

तालुक्यातील खड्यापाडयात असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतातील पिके सध्याच्या परिस्थितीत उमगत असताना व थोडेफार मोठे झाले असतानाच सदरच्या मुसळधार पावसाच्या आसमानी संकटामुळे पिके उध्वस्त झाले असल्याने नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी संबंधित तहसीलदारांना शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झालेल्या शेतातील पंचनामे करून तात्काळ अनुदान जाहीर करावे अशा आशियाचे निवेदन नायगावच्या तहसिलदार मंजूषाताई भगत यांना देण्यात येणार आहे

 गेल्या दोन दिवसापासून ग्रामीण भागात मुसळधार पावसाने जोर धरला असल्यामुळे नदी नाल्याला पूर येऊन शेकडो शेतकऱ्यांच्या शेतातील पिके खरडून गेले आहेत आणि या नायगाव तालुक्याच्या शेतकऱ्यावर दुबार तिबार पेरणीचे संकट कोसळले असल्यामुळे नायगावच्या तहसीलदार मंजुषाताई भगत यांनी प्रशासनातील तलाठी व मंडळाधिकारी यांना पंचनामे करण्यासाठी आदेशित करावे अशी मागणी छावा संघटनेचे नायागांव तालुका अध्यक्ष प्रताप पाटील सोमठाणकर यांनी करणार असल्याचे सांगितले आहे

Post a Comment

0 Comments