राज्यात लोकसभेच्या व विधानसभेच्या निवडणुकीची चाहूल लागल्यामुळे आगामी काळात राज्यात भाजपाची सत्ता प्रस्थापित करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहाच्या विराट सभेसाठी नांदेड येथे भाजपाचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली जोरदार तयारी करण्यात येत असल्याची माहिती भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस मा. शिवराज पाटील होटाळकर यांनी सदरची माहिती दिली आहे
भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्याचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी जिल्ह्याचे नेतृत्व करीत असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची नांदेड येथे विराट सभेचे आयोजन करण्यात आले आहे
नांदेड येथे होत असलेली अमित शहाची सभा ही काँग्रेस पक्षाचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांना आवाहन देणारी ठरणार असल्याने सदरच्या विराट सभेला जिल्ह्यातील भाजपाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे नायगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती शिवराज पाटील होटाळकर यांनी केले आहे
महाराष्ट्राच्या राजकारणात वेगवेगळे वारे वाहू लागले असले तरी परत एकदा राज्यात भाजपाचे सत्ता काबीज करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सन २०२४ साली होणार असल्यामुळे सदरची विराट सभा घेतली जात आहे
नांदेड जिल्ह्यातील चित्र बदलण्यासाठी भाजपाचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली सदरील सभेचे आयोजन करण्यात आले असल्याची ही माहिती माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील यांनी नायगाव फास्ट न्यूजशी बोलताना सांगितले आहे

0 Comments